आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
एफएसएसएआय -पश्चिम विभागाने,किसान दिनानिमित्त,आयोजित केलेल्या अन्न सुरक्षा जागरूकता कार्यक्रमात महिला शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी
Posted On:
19 DEC 2024 9:57PM by PIB Mumbai
मुंबई, 19 डिसेंबर 2024
किसान दिनानिमित्त, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या (FSSAI) पश्चिम क्षेत्राने शेतक-यांना शेतीमधील अन्न सुरक्षिततेच्या महत्त्वाबाबत शिक्षित करण्यासाठी एक जागृती कार्यक्रम आयोजित केला होता. हा कार्यक्रम अन्न सुरक्षा मानके, तांदूळाचे मूल्यवर्धन, कीटकनाशकांचा वापर आणि त्याचे दुष्परिणाम तसेच अन्नाचे योग्य लेबलिंग आणि पॅकेजिंग यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर केंद्रित होता.

जनजागृती कार्यक्रमात 150 हून अधिक महिला शेतकरी सहभागी झाल्या होत्या.
अन्न सुरक्षा शेतापासूनच कशी सुरू होते, यावर कार्यक्रमात उपस्थित तज्ञांनी भर दिला. कीटकनाशकांचा वापर कमी करणे तसेच पिके आणि ग्राहक या दोघांचे संरक्षण करण्यासाठी पर्यावरणपूरक पर्याय शोधण्याबाबत शेतकऱ्यांना या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमातील इतर सत्रांमध्ये तांदळाचे पोषण मूल्यवर्धन पौष्टिक मूल्य तसेच सुरक्षा आणि गुणवत्ता मानके पूर्ण करण्यासाठी योग्य लेबलिंग आणि पॅकेजिंगची आवश्यकता याबाबत देखील मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमात वैयक्तिक स्वच्छतेचे आणि शेती प्रक्रियेदरम्यान स्वच्छता राखण्याचे महत्त्व अधोरेखित केले गेले, कारण या पद्धती अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.सेंद्रिय शेतीसारख्या उदयोन्मुख पद्धतींचीही शेतकऱ्यांना ओळख करून देण्यात आली. या पद्धती आरोग्यदायी उत्पादन आणि पर्यावरण संवर्धनासाठी शाश्वत उपाय प्रदान करतात.
4LBU.jpeg)
अशा माहितीपूर्ण सत्रांव्यतिरिक्त, कार्यक्रमात तांदूळ-आधारित पाककृती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सहभागींनी तांदळाच्या पारंपारिक आणि नाविन्यपूर्ण पाककृतींचे प्रदर्शन केले. स्पर्धेला उत्साही प्रतिसाद मिळाला तसेच सहभागींच्या सर्जनशीलता आणि प्रयत्नांना अधोरेखित करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचा समारोप बक्षीस वितरण समारंभाने करण्यात आला.
हा उपक्रम शेतकऱ्यांना ज्ञानाने सक्षम बनवण्यासाठी तसेच सुरक्षित, शाश्वत कृषी पद्धतींना प्रोत्साहन देण्याच्या एफएसएसएआय च्या वचनबद्धतेची पुष्टी करतो.
N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2086288)
Visitor Counter : 39