वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एप्रिल-नोव्हेंबर 2024 मध्ये एकूण निर्यात 536.25 अब्ज डॉलर्स असल्याचा अंदाज, एप्रिल-नोव्हेंबर 2023 मधील 498.33 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत 7.61% वाढ

Posted On: 16 DEC 2024 9:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 डिसेंबर 2024

 

नोव्हेंबर 2024* साठी भारताची एकूण निर्यात (व्यापारी वस्तू   व सेवा एकत्रित) 67.79 अब्ज डॉलर्स असल्याचा अंदाज आहे, जी नोव्हेंबर 2023 च्या तुलनेत 9.59 टक्क्यांची सकारात्मक वाढ नोंदवते. नोव्हेंबर 2024 साठी एकूण आयात (व्यापारी वस्तू आणि सेवा एकत्रित) अंदाजे* 87.63 अब्ज डॉलर्स असून नोव्हेंबर 2023 च्या तुलनेत 27.47 टक्के सकारात्मक वाढीची नोंद झाली आहे.

तक्ता 1: नोव्हेंबर 2024 मधील  व्यापार*

 

 

November 2024

(USD Billion)

November 2023

(USD Billion)

Merchandise

Exports

32.11

33.75

Imports

69.95

55.06

Services*

Exports

35.67

28.11

Imports

17.68

13.68

Total Trade

(Merchandise +Services) *

Exports

67.79

61.85

Imports

87.63

68.74

Trade Balance

-19.84

-6.89

टीप: भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेली सेवा क्षेत्राची ताजी आकडेवारी ऑक्टोबर 2024 साठी आहे. नोव्हेंबर 2024 ची आकडेवारी हा एक अंदाज आहे, ज्यात  आरबीआयच्या त्यानंतरच्या प्रकाशनाच्या आधारे सुधारणा केली जाईल. (ii) एप्रिल-नोव्हेंबर 2023 आणि एप्रिल-जून 2024 साठीचा डेटा तिमाही  बॅलन्स ऑफ पेमेंट डेटा वापरून प्रो-रेटा आधारावर सुधारित करण्यात आला आहे.

आकृती 1: नोव्हेंबर 2024 दरम्यान एकूण व्यापार*

एप्रिल-नोव्हेंबर 2024* दरम्यान भारताची एकूण निर्यात 7.61 टक्के सकारात्मक वाढीसह 536.25 अब्ज डॉलर्स एवढी असल्याचा अंदाज आहे. एप्रिल-नोव्हेंबर 2024* दरम्यान एकूण आयात 9.55 टक्के वाढीसह  619.20 अब्ज डॉलर्स  असल्याचा अंदाज आहे.

तक्ता 2: एप्रिल-नोव्हेंबर 2024 दरम्यान व्यापार*

 

 

April-November 2024

(USD Billion)

April-November 2023

(USD Billion)

Merchandise

Exports

284.31

278.26

Imports

486.73

449.24

Services*

Exports

251.94

220.08

Imports

132.47

116.01

Total Trade

(Merchandise +Services) *

Exports

536.25

498.33

Imports

619.20

565.25

Trade Balance

-82.95

-66.91

आकृती 1: एप्रिल-नोव्हेंबर 2024 दरम्यान व्यापार*

वाणिज्य व्यापार

नोव्हेंबर 2024 मध्ये व्यापारी मालाची निर्यात नोव्हेंबर 2023 मधील  33.75 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत 32.11 अब्ज डॉलर्स इतकी होती.

नोव्हेंबर 2024 मध्ये वाणिज्य मालाची आयात नोव्हेंबर 2023 मधील 55.06 अब्ज डॉलर्सच्या  तुलनेत 69.95 अब्ज डॉलर्स होती.

आकृती 3: नोव्हेंबर 2024 दरम्यान वाणिज्य व्यापार

एप्रिल-नोव्हेंबर 2024  दरम्यान व्यापारी मालाची निर्यात एप्रिल-नोव्हेंबर 2023 मधील  278.26 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत  284.31 अब्ज डॉलर्स होती.

एप्रिल-नोव्हेंबर 2024 दरम्यान व्यापारी आयात 486.73 अब्ज डॉलर्स होती, जी एप्रिल-नोव्हेंबर 2023 दरम्यान 449.24 अब्ज डॉलर्स होती.

एप्रिल-नोव्हेंबर 2024 या कालावधीत वाणिज्य व्यापार तूट 202.42 अब्ज डॉलर्स होती, जी एप्रिल-नोव्हेंबर 2023 दरम्यान 170.98 अब्ज डॉलर्स होती.

आकृती 4: एप्रिल-नोव्हेंबर 2024 दरम्यान वाणिज्य व्यापार

सेवा व्यापार

नोव्हेंबर 2024* साठी सेवा निर्यातीचे अंदाजे मूल्य 35.67 अब्ज डॉलर्स  आहे जे नोव्हेंबर 2023 मध्ये  28.11 अब्ज डॉलर्स  होते.

नोव्हेंबर 2024* साठी सेवा आयातीचे अंदाजे मूल्य 17.68 अब्ज डॉलर्स आहे जे नोव्हेंबर 2023 मध्ये  13.68 अब्ज डॉलर्स होते.

आकृती 7: नोव्हेंबर 2024 दरम्यान सेवा व्यापार*

एप्रिल-नोव्हेंबर 2024* दरम्यान सेवा निर्यातीचे अंदाजे मूल्य  251.94 अब्ज डॉलर्स आहे,  जे एप्रिल-नोव्हेंबर 2023 मध्ये  220.08 अब्ज डॉलर्स होते.

एप्रिल-नोव्हेंबर 2024 दरम्यान सेवा आयातीचे अंदाजे मूल्य 132.47 अब्ज डॉलर्स  आहे जे एप्रिल-नोव्हेंबर 2023 मध्ये 116.01 अब्ज डॉलर्स  होते.

एप्रिल-नोव्हेंबर 2024* साठी सेवा व्यापार अधिशेष एप्रिल-नोव्हेंबर 2023 मधील 104.07 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत 119.48 अब्ज डॉलर्स आहे.

आकृती  8: एप्रिल-नोव्हेंबर 2024 दरम्यान सेवा व्यापार*

*त्वरित अंदाजांसाठी लिंक

 

* * *

N.Chitale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2085047) Visitor Counter : 6


Read this release in: English , Hindi