कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
‘प्रशासन गाव की ओर’ मोहीम : सार्वजनिक तक्रारींचे निराकरण करण्यासाठी दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी कार्यालय सर्व उपकार्यालयांमध्ये आयोजित करणार शिबिरे
देशव्यापी मोहिमेत 700 हून अधिक जिल्हाधिकारी कार्यालये होणार सहभागी
Posted On:
16 DEC 2024 7:52PM by PIB Mumbai
गोवा, 16 डिसेंबर 2024
सार्वजनिक तक्रारींचे निराकरण करण्यासाठी आणि सेवा वितरणात सुधारणा करण्यासाठी सुरू असलेल्या देशव्यापी 'प्रशासन गाव की ओर' मोहिमेचा एक भाग म्हणून, दक्षिण गोवा जिल्हा सामान्य जनतेच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी 18 ते 23 डिसेंबर 2024 दरम्यान विशेष शिबिरे आयोजित करणार आहे. या शिबिरात सामान्य माणसाच्या तालुका मामलतदार आणि उपजिल्हाधिकारी यांच्यासह सरकारी विभाग आणि कार्यालयांशी संबंधित तक्रारींचे निराकरण केले जाणार आहे.
4 था सुशासन सप्ताह 2024 अंतर्गत साजरा केला जाणारा ‘प्रशासन गाव की ओर’,ही 2 ते 31 ऑक्टोबर 2024 या कालावधीत केंद्रीय मंत्रालये, विभाग आणि सार्वजनिक उपक्रमांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विशेष मोहिम 4.0 ची विकेंद्रित आवृत्ती आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून, 19 ते 24 डिसेंबर 2024 दरम्यान भारतातील सर्व जिल्हे, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये अनेक उपक्रम राबवले जाणार आहेत.
या मोहिमेत 700 हून अधिक जिल्हाधिकारी सहभागी होणार असून ते अधिकारी तहसील आणि पंचायत समिती मुख्यालयांना भेटी देणार आहेत. सार्वजनिक तक्रारींचे निराकरण करण्यासाठी आणि सेवा वितरणात सुधारणा करण्यासाठी भारत सरकार तिसऱ्यांदा तहसील स्तरावर राष्ट्रीय मोहीम राबवत आहे. या मोहिमेचा उद्देश भावी पिढ्यांना प्रेरणा देईल अशी सुशासनासाठी एक राष्ट्रीय चळवळ निर्माण करणे हा आहे.
चौथ्या सुशासन सप्ताह 2024 मध्ये, दक्षिण गोवा जिल्ह्यातील उपक्रमांबद्दल बोलताना दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी एग्ना क्लीटस (IAS) यांनी सांगितले की, सार्वजनिक तक्रारींचे निराकरण करणे आणि सेवा वितरण सेवेची गती वाढवणे हे या विशेष शिबिरांचे उद्दिष्ट आहे. “कार्यक्रमांचा एक भाग म्हणून, दक्षिण गोवा जिल्ह्यासाठी यशोगाथांच्या दस्तऐवजीकरणासह नागरिक सनद चे देखील अनावरण केले जाईल, ज्यामुळे पुढील नवोपक्रम आणि सुधारणांना प्रेरणा मिळेल. पोलिस, आयएसएलआर, वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत, नगर आणि देश नियोजन विभाग या प्रमुख विभागाचे अधिकारी तसेच ग्रामपंचायती आणि नगरपालिकांचे अधिकारी विभाग-विशिष्ट तक्रारींचे निराकरण करण्यासाठी 21 डिसेंबर 2024 रोजी होणाऱ्या विशेष शिबिराला उपस्थित राहतील, ” असेही त्यांनी सांगितले.
या मोहिमेत सक्रिय सहभागी व्हावे असे आवाहन मी नागरिकांना करते. तुमच्या तक्रारी सामायिक करा, प्रदान केलेल्या सेवांचा वापर करा आणि आपल्या राज्याच्या प्रगतीत योगदान द्या, असेही त्या म्हणाल्या.
दक्षिण गोवा जिल्ह्यात सुशासन सप्ताहाचा एक भाग म्हणून आयोजित दैनिक आणि विशेष शिबिरांच्या तारखा आणि ठिकाणे पुढीलप्रमाणे आहेत:
18.12.2024 आणि 20.12.2024 रोजी सकाळी 10:00 ते दुपारी 12:00 पर्यंत उपजिल्हाधिकारी कार्यालयात तालुकास्तरावरील दैनंदिन शिबिरे |
उपजिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी (एसडीओ) फोंडा, मुरगाव, सालसेत (एसडीओ-I आणि एसडीओ-II), केपे, कानकोण, आणि धारबंडोर आणि सांगे येथील सांगे नगरपालिका सभागृह |
21.12.2024, शनिवार रोजी सकाळी 10:00 ते दुपारी 4:00 वाजेपर्यंत तालुकास्तरीय विशेष शिबिर |
उपजिल्हाधिकारी कार्यालय आणि उपविभागीय अधिकारी केपे, कानकोण, आणि धारबंडोर; क्रांती मैदान, फोंडा’ रवींद्र भवन, बेना, वास्को; मातानी साल्देना प्रशासकीय संकुल, सालसेत आणि सांगे नगर परिषद सभागृह |
* * *
PIB Panaji | N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2085015)
Visitor Counter : 22