नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महाराष्ट्रातील राष्ट्रीय जलमार्ग

Posted On: 13 DEC 2024 5:51PM by PIB Mumbai

 

राष्ट्रीय जलमार्ग कायदा, 2016 अंतर्गत महाराष्ट्रात एकूण 3089 किलोमीटर लांबीचे 15 जलमार्ग घोषित करण्यात आले आहेत. या राष्ट्रीय जलमार्गांची सविस्तर माहिती परिशिष्ट-1 मध्ये दिली आहे. यापैकी 6 राष्ट्रीय जलमार्गांची एकूण 530 किलोमीटर लांबी कार्यान्वित आहे. कार्यान्वित राष्ट्रीय जलमार्ग (एनडब्ल्यू) पुढीलप्रमाणे आहेत एनडब्ल्यू-10 (अंबा नदी), एनडब्ल्यू-53 (कल्याण- ठाणे- मुंबई जलमार्ग, वसई खाडी आणि उल्हास नदी), एनडब्ल्यू-83 (राजपुरी खाडी), एनडब्ल्यू-85 (रेवदंडा खाडी आणि कुंडलिका नदी), एनडब्ल्यू-91 (शास्त्री नदी – जयगड खाडी) आणि एनडब्ल्यू-73 (नर्मदा नदी).

निधी वाटप, वापर आणि वेळापत्रकाबाबत सविस्तर माहिती परिशिष्ट-2 मध्ये दिली आहे.

राष्ट्रीय जलमार्ग कायदा, 2016 अंतर्गत जाहीर केलेल्या राष्ट्रीय जलमार्गांचा विकासावर सरकारने लक्ष केंद्रीत केले आहे.

महाराष्ट्रातील राष्ट्रीय जलमार्गांच्या विकासाचा कोणताही प्रस्ताव मंजुरीसाठी सरकारकडे प्रलंबित  राहिलेला नाही.

भूप्रदेशांतर्गत जल वाहतुकीचा पर्याय वाहतुकीच्या इतर पर्यायांच्या जसे की रस्ते, रेल्वे यांच्या तुलनेत स्वस्त आहे आणि माल वाहतूक या पर्यायाकडे वळविल्यास वाहतूक खर्चात कपात करता येऊ शकते. तापी नदी (एनडब्ल्यू-100) च्या काठाने मोठे औद्योगिकरण होत आहे, अंबा नदी (एनडब्ल्यू-10), जयगड खाडी व शास्त्री नदी (एनडब्ल्यू-91) ही  भूप्रदेशांतर्गत दरवर्षी 98.67 एमएमटी मालवाहतूक शक्य करण्यातील मुख्य जलमार्गांची उदाहरणे आहेत. हे राष्ट्रीय जलमार्ग स्थानिक किनाऱ्यामागील भूप्रदेश आणि एक्झिम गेटवेजना जोडून घेतात. प्राथमिकतः सध्या रायगड, मुंबई आणि रत्नागिरी जिल्हे लाभार्थी आहेत.

परिशिष्ट – 1

महाराष्ट्रातील राष्ट्रीय जलमार्गांची सविस्तर माहिती

S.No

NW

River

Length (Km)

  1.  

NW10

Amba River

45

  1.  

NW28

Dabhol creek-Vashishti River

45

  1.  

NW53

Kalyan-Thane-Mumbai Waterway, Vasai Creek and Ulhas River

145

  1.  

NW72

Nag River

60

  1.  

NW83

Rajpuri creek

31

  1.  

NW85

Revdanda creek and Kundalika River

31

  1.  

NW89

Savitri River and Bankot creek

46

  1.  

NW91

Shastri River-Jaigad creek

52

  1.  

NW100

Tapi River

436

  1.  

NW70

Manjara River

242

  1.  

NW78

Penganga River-Wardha River

265

  1.  

NW109

Wainganga River-Pranahita River

164

  1.  

NW 73

Narmada River

226

  1.  

NW 4 (part)

Godavari River

1202

  1.  

NW 11

Arunavati – Aran River system

99

 

परिशिष्ट – 2

महाराष्ट्रातील राष्ट्रीय जलमार्गांसाठी निधी वाटप, वापर आणि वेळापत्रकाबाबत सविस्तर माहिती

S.No

Description

Fund Allocation

FY 2024-25

(in Rs.)

Fund Allocation

FY 2025-26

(in Rs.)

Funds Utilization

Timeline

(a)

Supporting Infrastructure (Dredging/ Channel Marking/ Bandalling/ Navigational Aids and RIS-V)

1.34 crore

14.76 crore

No payment made as the work has recently been awarded

 

December

2025

b)

Hydrographic Survey

0.34 crore

0.22 crore

No payment made as the work has recently been awarded

December

2025

(c)

Cargo Promotion

0.00 crore

0.20 crore

No payment made as the work has recently been awarded

December

2025

(d)

Miscellaneous Expenditure (Administrative expenses, training & capacity building, office establishment, periodic evaluation, Crisis Management Plan, contingencies PMU etc

1.70 crore

4.14 crore

No payment made as the work has recently been awarded

December

2025

 

Total Approved for Maha NWs:

3.38 crore

19.32 crore

 

 

 

ही माहिती केंद्रीय बंदर, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.

***

S.Kakade/R.Bedekar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2084354) Visitor Counter : 69


Read this release in: English , Urdu , Hindi