नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने सौर पॅनल निर्मितीला चालना देण्यासाठी ‘एएलएमएम आदेश - 2019’ मध्ये केली महत्त्वपूर्ण सुधारणेची घोषणा

Posted On: 10 DEC 2024 8:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 डिसेंबर 2024

नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने  सौर  पीव्ही  मॉड्यूल्सची मान्यताप्राप्त  मॉडेल्स आणि उत्पादक (एएलएमएम) आदेश , 2019 मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा जाहीर केली आहे. यामुळे भारताच्या सौर ऊर्जा क्षेत्रावर आणि त्याच्या स्वच्छ ऊर्जा संक्रमणावर दूरगामी परिणाम होईल. या दुरूस्तीची अंमलबजावणी  1 जून 2026 पासून लागू होणार आहे. या सुधारणेमध्‍ये  एएलएमएम  चौकट  अंतर्गत सौर पीव्‍ही  सेलसाठी बहुप्रतिक्षित सूची - दोन  सादर केली आहे. यामुळे  देशांतर्गत उत्पादनाला चालना मिळू शकणार आहे. त्याचबरोबर भारत नवीकरणीय  ऊर्जा उद्योगात आत्मनिर्भर होणाच्‍या दिशेने  एक मोठे, महत्वपूर्ण  पाऊल टाकू शकणार आहे.

सूची-दोनचा समावेश केल्यामुळे देशाच्या वेगाने वाढणाऱ्या सौर उत्पादन क्षमतेला मिळणारा प्रतिसाद दिसून आला आहे. आत्तापर्यंत, सूची-2 चा विचार केला गेला नव्‍हता.सौर बॅटरीचा  मर्यादित घरगुती पुरवठा केला जात होता. मात्र ,पुढील वर्षभरात भारताच्या सौर बॅटरीच्‍या  उत्पादन क्षमतेत भरीव वाढ अपेक्षित आहे. या  दुरुस्तीमुळे  उद्योगाची गतिशीलता वाढणार आहे. 1 जून 2026 पासून, प्रकल्पांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्व सोलर पीव्ही मॉड्यूल्स – सरकारने समर्थन दिलेल्या योजना, नेट-मीटरिंग प्रकल्प आणि ‘ओपन ऍक्सेस’ नूतनीकरणक्षम ऊर्जा उपक्रमांसह - त्यांच्या सौर बॅटरी  एएलएमएम  सूची- दोनमधून मिळवणे आवश्यक आहे जेणेकरून भारतातील ऊर्जा पायाभूत सुविधांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सौर पीव्ही बॅटरींची गुणवत्ता आणि विश्वासार्हता सुनिश्चित होईल.

ज्या प्रकल्पांची आधीच बोली लावली गेली आहे परंतु ज्यांची बोली सादर करण्याची अंतिम तारीख हा आदेश जारी होण्यापूर्वी आहे,  त्यांना  यासाठी दिलेली सवलत लागू होईल, त्यांना सूची-दोन मधील सौर पीव्ही सेल  वापरण्याची आवश्यकता असणार नाही. तसेच  पुढील कार्यवाहीची  परवानगी दिली जाईल.जरी त्यांची कार्यान्वित होण्याची तारीख  1 जून 2026 नंतरची असली, तरीही त्यांना परवानगी दिली जाईल. तथापि, भविष्यातील सर्व बोलींसाठी संबंधित एएलएमएम सूचींमधून सौर पीव्ही मॉड्यूल आणि सेल   या दोन्हीची खरेदी अनिवार्य  असेल . या सुधारणा भारताच्या सौर ऊर्जा क्षेत्रातील गुणवत्ता हमी आणि शाश्‍वततेच्या दिशेने निर्णायक पाऊल  आहे.

S.Kane/S.Bedekar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 


(Release ID: 2082944) Visitor Counter : 33


Read this release in: English , Urdu , Hindi , Kannada