संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत रशिया येथे ‘आयएनएस तुशील’ ही अत्याधुनिक बहु उद्देशीय मार्गदर्शित क्षेपणास्त्र युद्धनौका भारतीय नौदलात सामील

Posted On: 09 DEC 2024 7:21PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 डिसेंबर 2024


आयएनएस तुशील (F 70), अत्याधुनिक बहु उद्देशीय मार्गदर्शित क्षेपणास्त्र युद्धनौका, 9 डिसेंबर 2024 रोजी रशियाच्या कॅलिनिनग्राड येथील यंतर शिपयार्डमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत भारतीय नौदलात सामील करण्यात आली. या युद्धनौकेचे नौदलात सामील होणे हे भारताच्या वाढत्या सागरी सामर्थ्याचा गौरवास्पद दाखला असल्याचे   संरक्षण मंत्री आपल्या भाषणात म्हणाले. ही युद्धनौका, भारत आणि रशिया यांच्यातील  जी सामायिक मूल्ये, परस्पर विश्वास तसेच विशेष आणि धोरणात्मक विशेषाधिकार असलेल्या भागीदारीच्या दीर्घकालीन मैत्री संबंधातील एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड असल्याचेही सिंह यांनी सांगितले.

'आत्मनिर्भर भारत' या भारताच्या संकल्पनेला रशियाने दिलेला पाठिंबा हे भारत आणि रशिया यांच्यातील गाढ मैत्रीचे आणखी एक महत्त्वाचे उदाहरण आहे, असे उद्गार राजनाथ सिंह यांनी काढले. "आयएनएस तुशीलसह अनेक जहाजांमध्ये भारतात तयार झालेली सामुग्री असण्याचे प्रमाण सतत वाढत आहे. ही युद्धनौका म्हणजे रशियन आणि भारतीय उद्योगांच्या सहयोगी पराक्रमाचा मोठा दाखला आहे. हा उपक्रम भारताच्या संयुक्तरीत्या तंत्रज्ञानाच्या उत्कृष्टतेकडे जाणाऱ्या प्रवासाचे उदाहरण आहे," असेही ते म्हणाले.

भारतीय नौदल प्रथम प्रतिसादकर्ता म्हणून आपल्या क्षेत्रातील मित्रांना जलद आणि वेळेवर मानवतावादी मदत पुरवण्यासाठी तसेच आपत्ती निवारणासाठी नेहमीच तयार असते, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.

भारत आणि रशिया आगामी काळात नवीन ऊर्जा आणि उत्साहाने आपल्या सहकार्याची पूर्ण क्षमता ओळखतील, असा विश्वास संरक्षण मंत्र्यांनी व्यक्त केला. दोन्ही देश केवळ विद्यमान सहकार्याच्या क्षेत्रांनाच बळकट करणार नाहीत, तर नवीन आणि आजवर सहकार्य केले नाही अशा क्षेत्रातही काम करण्यास प्राधान्य देतील यावर त्यांनी भर दिला.

 

S.Kane/S.Mukhedkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 


(Release ID: 2082456) Visitor Counter : 44


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil