संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

‘इनो-योद्धा’ या वार्षिक कल्पना आणि नवोन्मेष स्पर्धा 2024 मध्ये भारतीय लष्कराने आपल्या अनुभवांवर आधारित नवोन्मेष प्रदर्शित केले

Posted On: 05 DEC 2024 9:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 डिसेंबर 2024

 

भारतीय लष्कराने नवी दिल्लीतील माणेकशॉ सेंटर येथे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या उपस्थितीत इनो-योद्धा 2024-25 नावाची कल्पना आणि नवोन्मेष स्पर्धा तसेच चर्चासत्राचे आयोजन केले. इनो-योद्धा हा भारतीय लष्कराद्वारे आयोजित केला जाणारा वार्षिक कार्यक्रम आहे. विद्यमान क्षमता पोकळी कमी करण्यासाठी, परिचालन, लॉजिस्टिक्स, प्रशिक्षण क्षमता वाढवण्यासाठी आणि परिचालन परिणामकारकता वाढवण्यासाठी इन-हाऊस नवोन्मेष आयोजित केले जाते.

भारतीय सैन्याला विविध आव्हानांना सामोरे जावे लागते. भौगोलिक प्रदेश, हवामान आणि प्रतिकूल धोक्यांमुळे आव्हाने वाढली आहेत. भारतीय लष्कर आपल्या जवानांना आलेल्या अनुभवांवर आधारित नवोन्मेषाला प्रोत्साहन देते. हे जवान त्यांची आवड, व्यावसायिक क्षमता आणि तंत्रज्ञानाने प्रेरित होऊन, संबंधित क्षेत्रात  आलेल्या आव्हानांवर आंतरिक अनुभवाने उपाय शोधतात.

“इनो-योद्धा 2024-25” एक  स्पर्धा म्हणून आयोजित करण्यात आली होती आणि यात नवीन कल्पना आणि अभिनव उपायांची सुविधा होती जी जवानांना चौकटीबाहेर विचार करण्यास प्रोत्साहित करणारी होती. निवडक अभिनव कल्पना संशोधन आणि विकास / डिझाइन आणि विकास / आर्मी टेक्नॉलॉजी बोर्ड प्रकल्प आणि बेस वर्कशॉप्सद्वारे उत्पादन सुधारणेच्या माध्यमातून  पुढे नेल्या जातात. निवडलेल्या नवोन्मेषासाठी बौद्धिक संपदा हक्क देखील प्राप्त केले जातात. यशस्वी अद्यतन  आणि मजबुतीकरणानंतर, भारतीय सैन्यासाठी औद्योगिक दर्जाच्या घाऊक  प्रमाणात उत्पादित उत्पादनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हे तंत्रज्ञान उद्योगाकडे हस्तांतरित केले जाते. हा उपक्रम भारतीय लष्कराच्या ‘आत्मनिर्भर भारत’ च्या दिशेने प्रयत्नांना चालना देतो.

या वर्षी, संपूर्ण भारतीय लष्कराच्या विविध क्षेत्रांमधून युनिट स्तरापासून फॉर्मेशन स्तरापर्यंत आणि शेवटी संबंधित कमांड मुख्यालयपर्यंतच्या निवडीनंतर एकूण 75 अभिनव कल्पना सादर करण्यात आल्या. या 75 नवोन्मेषांपैकी 22 अव्वल नवोन्मेष  कार्यक्रमादरम्यान प्रदर्शित करण्यात आले आणि लष्करप्रमुखांद्वारे त्यांचा सत्कार करण्यात आला. फील्ड फॉर्मेशनच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आर्मी डिझाईन ब्युरोच्या अंतर्गत उत्पादनासाठी ते पुढे नेले जाईल.

लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी नवोन्मेषकांच्या  सर्जनशीलतेचे आणि कल्पकतेचे कौतुक केले आणि सर्व श्रेणीतील अधिकाऱ्यांना चिकित्सेने विचार करण्यासाठी आणि समस्या सोडवण्यासाठी नाविन्यपूर्ण दृष्टिकोन आत्मसात करण्याचे आवाहन केले.

 

* * *

S.Patil/S.Kane/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2081334) Visitor Counter : 32


Read this release in: English , Urdu , Hindi