खाण मंत्रालय
पी.एन. शर्मा यांनी भारतीय खाण ब्युरो येथे महानियंत्रक (स्वतंत्र कार्यभार) पदाचा कार्यभार स्वीकारला
Posted On:
05 DEC 2024 7:50PM by PIB Mumbai
नागपूर, 5 डिसेंबर 2024
पीयूष नारायण शर्मा यांनी बुधवारी भारतीय खाण ब्युरोचे महानियंत्रक (स्वतंत्र कार्यभार) म्हणून पदभार स्वीकारला. नागपुरात मुख्यालय असलेले भारतीय खाण ब्युरो हे केंद्र सरकारच्या खाण मंत्रालयाच्या अधीनस्थ कार्यालय आहे.
पी.एन. शर्मा यांनी 1997 मध्ये सहाय्यक खाण नियंत्रक म्हणून भारतीय खाण ब्युरो (आयबीएम) येथे प्रवास सुरू केला होता. शर्मा यांनी आयबीएम मधील असंख्य प्रकल्प साकारताना त्यांची कुशाग्रता आणि तीक्ष्ण तांत्रिक ज्ञानाची चुणूक दाखवली. तांत्रिक सल्लागार असाइनमेंट ; शाश्वत विकास आराखडा; स्टार-रेटिंग टेम्पलेट्स विकसित करणे, शाश्वत खाण पद्धती, ऑनलाइन पोर्टल्सचा विकास, खाण योजनांच्या प्रक्रियेसाठी ऑनलाइन टेम्पलेट्सचा विकास, मायनिंग टेन्मेन्ट प्रणालीचे नूतनीकरण इत्यादी क्षेत्रात भविष्यवेधी दृष्टीकोन असलेले उपक्रम हे त्यापैकी उल्लेखनीय आहेत.

खाण व्यावसायिक म्हणून, शर्मा यांनी खाण क्षेत्रात अंतराळ तंत्रज्ञानाचा विकास आणि अवलंब करण्याची संकल्पना मांडली आणि साकार केली. आयबीएम ने उपग्रहाच्या वापराद्वारे खाणकामांवर देखरेख ठेवण्यासाठी हैदराबाद येथील नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर ला सहभागी करून घेतले.
पी.एन. शर्मा यांच्या धडाडीच्या नेतृत्वाखाली देशातील खाण आणि खनिज विकास उपक्रमांच्या क्षेत्रात नवी उंची गाठण्याचे भारतीय खाण ब्युरोचे उद्दिष्ट असेल.
* * *
PIB Mumbai | S.Patil/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2081290)
Visitor Counter : 33