आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जागतिक एडस् दिवस 2024

Posted On: 30 NOV 2024 11:40AM by PIB Mumbai

 

जागतिक एडस् दिवस हा 1988 पासून दरवर्षी 1 डिसेंबर रोजी पाळण्यात येतो. सर्वांनी एकत्र येऊन HIV (मानवी रोगप्रतिकारक्षमता कमी करणारा विषाणू) / AIDS (रोगप्रतिकारक्षमता कमी झाल्यामुळे होणारा आजार) याविषयी जागरुकता वाढविणे आणि साथरोगाविरुद्ध लढण्यासाठीची एकता दाखवून देणे, यासाठीचे जागतिक व्यासपीठ म्हणून या दिवसाकडे पाहिले जाते.

एडस् संदर्भातली सध्याची आव्हाने अधोरेखित करण्यासह या आजारावरील प्रतिबंधात्मक उपाय, उपचार आणि देखभाल यांचा आढावा घेण्यासाठीची संधी यामुळे सरकार, सामाजिक संस्था आणि विविध समुदाय यांना उपलब्ध होते.

आंतरराष्ट्रीय स्तरावर पाळल्या जाणाऱ्या आरोग्यविषयक दिवसांमधील हा एक महत्त्वाचा दिवस मानला जातो. यादिवशी केवळ जनजागृतीच केली जात नाही तर एडस् मुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींचे स्मरण केले जाते आणि या आजारावरील आरोग्यसेवा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होण्यासारखे यशदेखील साजरे केले जाते.

एचआयव्ही विषाणू संसर्ग ही गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्या असल्याचे समजून घेण्यात सहाय्य करतानाच एडस् विरोधी लढा व वैश्विक आरोग्य संपन्नता आणि आरोग्यविषयक हक्क यांचे महत्त्व अधोरेखित करण्याचे काम जागतिक एडस् दिवस करतो.

सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा..

https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2079302

***

H.Akude/S.Joshi/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2079322) Visitor Counter : 51