सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
2024-25 च्या दुसऱ्या तिमाहीसाठी (जुलै-सप्टेंबर) सकल देशांतर्गत उत्पादनाच्या अंदाजांसंदर्भात प्रसिद्धी पत्रक
आर्थिक वर्ष 2024-25 च्या दुसऱ्या तिमाही मध्ये वास्तविक जीडीपी 5.4% ने वाढण्याचा अंदाज
Posted On:
29 NOV 2024 4:00PM by PIB Mumbai
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या (एनएसओ), प्रसिद्धी पत्रकात, आर्थिक वर्ष 2024 -25 च्या जुलै-सप्टेंबर या दुसऱ्या तिमाहीसाठी सकल देशांतर्गत उत्पादनाचे त्याच्या खर्चाच्या स्थिरांक (2011-12) आणि वर्तमान दर या दोन्ही घटकांसह त्रैमासिक अंदाज जारी करत आहे.
वर्ष दर वर्ष टक्केवारीतील बदलांसह आर्थिक व्यवहारांच्या आधारे आणि आर्थिक वर्ष 2022-23, 2023-24 आणि 2024-25 साठी स्थिरांक आणि वर्तमान दर या दोन्ही घटकांसह सकल मूल्यवर्धितांचे तिमाही आणि अर्ध-वार्षिक(एप्रिल-सप्टेंबर) अंदाज परिशिष्ट अ च्या 1 ते 8 निवेदनात दिले आहेत.
ठळक वैशिष्ट्ये:
- वास्तविक जीडीपी आर्थिक वर्ष 2023-24 च्या दुसऱ्या तिमाही मधील 8.1% वाढीच्या दरापेक्षा 2024-25 च्या दुसऱ्या तिमाही मध्ये 5.4% ने वाढण्याचा अंदाज आहे. आर्थिक वर्ष 2024-25 च्या दुसऱ्या तिमाहीत उत्पादन (2.2%) आणि खाणकाम आणि उत्खनन (-0.1%) क्षेत्रांमध्ये मंदगतीची वाढ दिसून आली असली तरी, पहिल्या सहामाहीत (एप्रिल-सप्टेंबर) मध्ये वास्तविक जीव्हीए ने 6.2% वाढ नोंदवली आहे.
- वास्तविक जीव्हीए मागील आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीमधील 7.7% वृद्धीदराच्या तुलनेत 2024-25 च्या दुसऱ्या तिमाहीत 5.6% वाढला आहे.
- आर्थिक वर्ष 2024-25 च्या दुसऱ्या तिमाहीत 3.5% वाढीचा दर नोंदवून कृषी आणि संलग्न क्षेत्राने पुन्हा उसळी घेतली आहे.
Fig. 1: 2021-22 या आर्थिक वर्षाची पहिली तिमाही ते 2024-25 या आर्थिक वर्षाची दुसरी तिमाही मधील वर्ष दर वर्ष वृद्धी दरांसह स्थिरांकी दरांवर तिमाही जीडीपी आणि जीव्हीए अंदाज
***
N.Chitale/S.Patil/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2079261)
Visitor Counter : 127