कोळसा मंत्रालय
वाणिज्यिक खाणकामासाठी कोळसा खाणींच्या लिलावाच्या 10 व्या फेरीत 9 खाणींचा यशस्वी लिलाव
Posted On:
27 NOV 2024 2:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2024
कोळसा मंत्रालयाने 21 जून 2024 रोजी वाणिज्यिक खाणकामासाठी कोळसा खाणींच्या लिलावाची 10 वी फेरी सुरू केली होती. याअतंर्गतच्या लिलावात एकूण नऊ कोळसा खाणींचा यशस्वी लिलाव करण्यात आला. यामध्ये तीन पूर्णपणे उत्खनन केलेल्या खाणी आणि अंशतः उत्खनन केलेल्या सहा कोळसा खाणींचा समावेश आहे. या नऊ खाणींमध्ये मिळून 3,998.73 दशलक्ष टन साठा असल्याचं कोळसा मंत्रालयानं म्हटलं आहे. अंशत: उत्खनन केलेल्या कोळसा खाणी वगळून या खाणींची एकूण पीक रेटेड क्षमता (PRC) अर्थात नियोजनानुसार उत्खनानाअंती उत्पादन घेण्याची क्षमता 14.10 दशलक्ष टन प्रतिवर्ष (MTPA) इतकी असल्याची माहिती कोळसा मंत्रालयाने दिली आहे.
या लिलावाचा खाणनिहाय निकाल खाली दिला आहे :
S. No.
|
Name of the Mine
|
State
|
PRC (mtpa)
|
Geological Reserves (MT)
|
Closing Bid Submitted by
|
Reserve Price (%)
|
Final Offer (%)
|
Coking/Non-Coking
|
1
|
Bundu
|
Jharkhand
|
1.00
|
102.268
|
S M Steels and Powver Limited
|
4.00
|
16.75
|
Non-Coking
|
2
|
Gare Palma IV/5
|
Chhattisgarh
|
1.10
|
77.990
|
Sarda Energy and Minerals Limited
|
4.00
|
25.75
|
Non-Coking
|
3
|
Kerendari-BC North
|
Jharkhand
|
NA
|
600.000
|
Orissa Alloy Steel Private Limited
|
4.00
|
23.25
|
Non-Coking
|
4
|
Marwatola South
|
Madhya Pradesh
|
NA
|
126.300
|
Mineware Advisors Private Limited
|
4.00
|
22.25
|
Non-Coking
|
5
|
New Patrapara South
|
Odisha
|
12.00
|
720.870
|
NLC India Limited
|
4.00
|
5.50
|
Non-Coking
|
6
|
Sarai East (South)
|
Madhya Pradesh
|
NA
|
128.600
|
ACC Limited
|
4.00
|
5.50
|
Non-Coking
|
7
|
Ulia Gamhardih
|
Chhattisgarh
|
NA
|
587.700
|
S M Steels and Powver Limited
|
4.00
|
42.50
|
Non-Coking
|
8
|
Gawa (East)
|
Jharkhand
|
NA
|
55.000
|
Shreeji Nuravi Coal Mining and Trading Private Limited
|
4.00
|
7.00
|
Non-Coking
|
9
|
Bartap(Revised)
|
Odisha
|
NA
|
1,600.000
|
JSW Energy Utkal Limited
|
4.00
|
8.50
|
Non-Coking
|
या संपूर्ण लिलाव प्रक्रियेत तीव्र स्पर्धा दिसून आली. या लिलावाअंतर्गत सरासरी 17.44% टक्के इतक्या महसुली वाट्यापर्यंत पोहचता आले. या लिलावाला मिळालेल्या प्रतिसादानातून कोळसा क्षेत्रामध्ये उद्योग क्षेत्राचा शाश्वत असलेला रस आणि त्याचवेळी कोळसा क्षेत्रासाठी स्थिर आणि पारदर्शक धोरणात्मक आराखडा देण्यासाठी कोळसा मंत्रालयाकडून होत असलेल्या प्रयत्नांचेच प्रतिबिंब उमटले.या खाणींमधून वार्षिक ₹1,446 कोटी रुपये इतका महसूल (अंशत: उत्खन्नन झालेल्या खाणी वगळून) मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे सुमारे ₹2,115 कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक आकर्षित होऊ शकेल तसेच 19,063 इतक्या रोजगाराच्या संधीही निर्माण होऊ शकणार आहेत.
2020 मध्ये वाणिज्यिक कोळसा खाणकाम सुरू झाल्यापासून आतापर्यंत एकूण 113 कोळसा खाणींचा यशस्वी लिलाव करण्यात आला आहे, याची उत्पादन क्षमता वार्षिक 257.60 दशलक्ष टन इतकी आहे. या खाणी कार्यान्वित झाल्यानंतर देशांतर्गत कोळशाचे उत्पादन वाढायला आणि देशाला कोळसा क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्यात मोठा हातभार लागू शकणार आहे. या खाणींमुळे देशाला वार्षिक 35 हजार 437 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळू शकेल, त्यासोबतच 38 हजार 641 कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक होऊ शकेल आणि कोळसा उत्पादक क्षेत्राशी संबंधित 3 लाख 48 हजार 268 जणांना रोजगार उपलब्ध होऊ शकणार आहे.
कोळसा मंत्रालयाच्या या धोरणात्मक उपक्रमांमधून कोळसा क्षेत्राला देशाच्या आर्थिक विकासाला पुढे नेणारा एक प्रमुख घटक बनविण्यासाठी, कोळसा मंत्रालय समर्पण भावनेने कार्यरत असल्याचे ठळकपणे दिसून येत आहे. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे, देशाच्या ऊर्जेच्या मागणीची पूर्तता करण्यासोबतच, आर्थिक स्थैर्य वाढवण्याला तसेच रोजगाराच्या संधी निर्माण करण्यालाही हातभार लागत असून, या सर्व माध्यमातून आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्याच्या प्रयत्नांनाही हातभार लागत आहे.
H.Akude/T.Pawar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2077864)
Visitor Counter : 13