अर्थ मंत्रालय
पॅन आणि टॅन यांना अधिक सोपे आणि वापरकर्ता स्नेही आणि कार्यक्षम बनवून ते जारी करण्याची आणि त्यांचे व्यवस्थापन करण्याची प्रक्रिया सुविहित आणि आधुनिक करण्यासाठी सीबीडीटीचा पॅन 2.0 प्रकल्प
Posted On:
26 NOV 2024 9:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर 2024
पॅन आणि टॅनशी संबंधित अर्ज, अद्यतनीकरण, सुधारणा, आधार-पॅन लिंकिंग, पुन्हा प्रदान करण्याच्या विनंत्या आणि अगदी ऑनलाईन पॅन प्रमाणीकरण यांसह विविध मुद्दे/ प्रकरणे यांचे सर्वसमावेशकतेने निरसन करण्यासाठी पॅन 2.0 हा प्रकल्प एक-थांबा मंच आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीने प्राप्तिकर विभागाच्या परमनंट अकाऊंट नंबर(पॅन) 2.0 प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. पॅन आणि टॅन यांना अधिक वापरकर्ता स्नेही आणि कार्यक्षम बनवून ते जारी करण्याची आणि त्यांचे व्यवस्थापन करण्याची प्रक्रिया सुविहित आणि आधुनिक करण्याचा या प्रकल्पाचा उद्देश आहे. सध्या अस्तित्वात असलेला पॅन डेटाबेस 78 कोटी पॅन आणि 73.28 लाख टॅनचा असून विविध प्रकारचे मंच/ पोर्टल्स एकीकरण करण्यावर आणि पॅन/ टॅन धारकांना कार्यक्षम सेवा देण्यावर भर देत करदात्यांच्या गरजांची पूर्तता करणारा हा प्रकल्प आहे. सध्या पॅन-संबंधित सेवा, ई-फायलिंग पोर्टल, यूटीआयआयटीएसएल पोर्टल आणि प्रोटिअन ई-जीओव्ही पोर्टल या तीन वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर विस्तारलेल्या आहेत. पॅन 2.0 च्या अंमलबजावणीमुळे या सर्व सेवा एका, एकीकृत पोर्टलमध्ये एकत्रित होणार आहे. पॅन 2.0 हा एक-थांबा मंच, पॅन आणि टॅनशी संबंधित अर्ज, अद्यतनीकरण, सुधारणा, आधार-पॅन लिंकिंग, पुन्हा प्रदान करण्याच्या विनंत्या आणि अगदी ऑनलाईन पॅन वैधताकरण यांसह विविध मुद्दे/ प्रकरणे यांची सर्वसमावेशकतेने हाताळणी करणार आहे. असे करून प्रक्रिया सोपे करण्याचा, विलंब टाळण्याचा आणि तक्रार निवारण यंत्रणेत सुधारणा करण्याचा प्राप्तिकर विभागाचा प्रयत्न आहे.
पॅन 2.0 प्रकल्प डिजिटल इंडिया उपक्रमाशी संलग्न होण्याच्या दिशेने देखील एक महत्त्वाचे पाऊल आहे. विनिर्दिष्ट सरकारी एजन्सींच्या सर्व डिजिटल सिस्टीमसाठी पॅन एक सामाईक ओळखकर्ता म्हणून प्रस्थापित करताना तो पर्यावरण-स्नेही कागदविरहित प्रक्रियांवर भर देणारा आहे.
पॅन 2.0 ची प्रमुख वैशिष्ट्ये:
- वापरकर्त्यांची हाताळणी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी पॅन/टॅन संबंधित सर्व सेवांसाठी एकच पोर्टल.
- कागदपत्रे कमी करण्यासाठी पर्यावरण-स्नेही कागदविरहित प्रक्रियांवर भर.
- जलद प्रक्रिया कालावधीद्वारे पॅन मोफत जारी केले जाईल
- पॅन डेटा व्हॉल्टसह वाढीव सुरक्षा उपायांच्या माध्यमातून वैयक्तिक आणि लोकसंख्याशास्त्रीय आकडेवारीचे संरक्षण केले जाईल.
- वापरकर्त्यांच्या समस्या आणि प्रश्नांचे निरसन करण्यासाठी एक समर्पित कॉल सेंटर
जलद सेवा वितरण, प्रभावी तक्रार निवारण आणि संवेदनशील डेटाचे उत्तम संरक्षण सुनिश्चित करून करदात्यांचा या सेवेच्या वापराचा एकंदर अनुभव सुधारण्यासाठी या अद्ययावतीकरणाची रचना केली आहे. या प्रकल्पामुळे वापरकर्त्यांना पॅन/टॅनसाठी ऑनलाईन अर्ज करणे, त्यांचे तपशील अद्ययावत करणे आणि पॅन माहिती डिजिटल पद्धतीने प्रमाणित करणे सोपे होईल. या प्रक्रियांचे एकत्रीकरण करून आणि पुनर्अभियांत्रिकी करून, प्राप्तिकर विभागाने करदात्यांसाठी एक अखंड, पारदर्शक आणि सर्वसमावेशक प्रणाली निर्माण करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
अधिक तपशीलांसाठी, कृपया खाली वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ) पहा:
पॅन 2.0 प्रकल्पावर वारंवार विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न 1
पॅन 2.0 काय आहे?
पॅन 2.0 प्रकल्प करदाता नोंदणी सेवांच्या व्यावसायिक प्रक्रियांची पुनर्अभियांत्रिकी करण्यासाठी आयटीडीचा एक ई-गव्हर्नन्स प्रकल्प आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अंगिकार करून पॅन सेवांचा दर्जा वाढवणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. या प्रकल्पांतर्गत आयटीडी, पॅन वाटप/अपडेटेशन आणि सुधारणांशी संबंधित सर्व प्रक्रिया एकत्रित करत आहे. टॅन संबंधित सेवा देखील या प्रकल्पात विलीन केल्या आहेत. याशिवाय, ऑनलाइन पॅन प्रमाणीकरण सेवेद्वारे पॅन प्रमाणीकरण/वैधताकरण, वित्तीय संस्था, बँका, सरकारी संस्था, केंद्र आणि राज्य सरकारी विभाग इत्यादींसारख्या वापरकर्त्या एजन्सींना उपलब्ध करून दिले जाईल.
प्रश्न क्र. 2
पॅन 2.0 हे विद्यमान व्यवस्थेपेक्षा कसे वेगळे आहे?
i. मंचाचे एकत्रीकरण: सध्या पॅनशी संबंधित सेवा तीन वेगेवगळ्या पोर्टल्सद्वारे संचालित केल्या जातात (ई-फायलिंग पोर्टल, युटीआयआयटीएसएल पोर्टल आणि प्रोटीएन ई-गव्ह पोर्टल). पॅन 2.0 प्रकल्पात सर्व पॅन/टॅन संबंधित सेवा आता आयटीडीच्या एकल एकात्मिक पोर्टल वरुन संचालित होतील. वितरण, अद्ययावतीकरण, दुरुस्ती, ऑनलाईन पॅन प्रमाणीकरण (ओपीव्ही), नो युवर एओ, आधार- पॅन जोडणी, तुमच्या पॅनची सत्यता तपासा, ई- पॅन साठी विनंती, पॅन कार्ड पुन्हा छापून घेण्यासाठी विनंती अशा अनेक प्रकारच्या पॅन आणि टॅनशी संबंधित सर्व सेवांसाठी हे नवे पोर्टल उपयुक्त असेल.
ii. कागदविरहित प्रक्रियांसाठी तंत्रज्ञानाचा सर्वसमावेशक वापर: विद्यमान पद्धतीऐवजी संपूर्णतः कागदविरहित ऑनलाइन प्रक्रिया
iii. करदात्यांसाठी सुविधांमध्ये सुलभता: पॅनसंदर्भातील वितरण/अद्ययावतीकरण/दुरुस्ती या सेवा मोफत असतील आणि ई-पॅन कार्डधारकाच्या नोंदणीकृत मेल आयडी वर पाठवले जाईल. प्रत्यक्ष स्वरूपातील पॅनकार्ड मिळवण्यासाठी अर्जदाराला देशांतर्गत प्रकारात 50 रुपयांच्या विहित शुल्कासह विनंती सादर करावी लागेल. भारताबाहेर हे कार्ड पाठवण्यासाठी 15 रुपये अधिक इंडिया पोस्टचे नियमानुसार होईल, ते शुल्क अर्जदाराला भरावे लागेल.
प्रश्न क्र. 3
i. विद्यमान पॅन कार्ड धारकांना अद्ययावत प्रणालीअंतर्गत नव्या पॅन साठी अर्ज करावा लागेल का?
ii. पॅन क्रमांकात बदल होईल का?
नाही, विद्यमान पॅन कार्ड धारकांना अद्ययावत प्रणालीअंतर्गत (पॅन 2.0)नव्या पॅन साठी अर्ज करावा लागणार नाही.
प्रश्न क्र. 4
लोकांना पॅनमधील नाव, स्पेलिंग्स, पत्त्यातील बदल इत्यादी दुरुस्त्या करण्याचा पर्याय उपलब्ध आहे का?
होय, विद्यमान पॅन कार्ड धारकांना त्यांच्या सध्याच्या पॅनमधील ईमेल, मोबाईल क्रमांक किंवा पत्ता अथवा नाव, जन्मतारीख यासारख्या तपशीलात बदल/ अद्ययावतीकरण करायचे असल्यास त्यांना पॅन 2.0 प्रकल्प प्रत्यक्ष अंमलात आल्यानंतर ते मोफत करता येतील. पॅन 2.0 प्रकल्प सुरु होईपर्यंत पॅन कार्ड धारकांना खालील लिंक्सचा वापर करून ईमेल, मोबाईल आणि पत्त्यातील अद्ययावतीकरण/दुरुस्तीसाठी आधार क्रमांकावर आधारित ऑनलाईन सुविधेचा लाभ घेता येईल:
i. https://www.onlineservices.nsdl.com/paam/endUserAddressUpdate.html
ii. https://www.pan.utiitsl.com/PAN_ONLINE/homeaddresschange
याखेरीज पॅन कार्ड मधील इतर कोणत्याही अद्ययावतीकरण/दुरुस्तीसाठी कार्ड धारकाला प्रत्यक्ष केंद्राला भेट देऊन किंवा शुल्कासह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून त्याचे काम करून घेता येईल.
प्रश्न क्र. 5
पॅन 2.0 अंतर्गत मला माझे पॅन कार्ड बदलावे लागेल का?
नाही, जर पॅन कार्ड धारकाला कोणतेही अद्ययावतीकरण/दुरुस्ती करायची नसेल तर त्याचे पॅन कार्ड बदलणार नाही. पॅन 2.0 अंतर्गत सध्याच्या वैध पॅन कार्डची वैधता कायम राहील.
प्रश्न क्र. 6
i. अनेक लोकांनी कार्डावरील त्यांचे पत्ते बदललेले नाहीत आणि त्यावर जुनाच पत्ता अजूनही आहे. मग नवे पॅन कसे वितरीत होईल?
ii. नवे पॅन कार्ड कधी वितरीत होईल?
पॅन कार्ड धारकाने त्याच्या विद्यमान पॅन मध्ये कोणतेही अद्ययावतीकरण/ दुरुस्ती करण्याची विनंती केलेली नसेल तर नवे पॅन कार्ड वितरीत केले जाणार नाही. जुना पत्ता बदलून अद्ययावतीकरण करू इच्छिणाऱ्या पॅन कार्ड धारकांना आधार क्रमांकावर आधारित ऑनलाईन सुविधा केंद्रात खालील लिंक्सचा वापर करून पत्त्यातील बदल मोफत करून मिळेल:
त्यानुसार, पॅनच्या डाटाबेस मध्ये नवा पत्ता अद्ययावत केला जाईल
प्रश्न 7
i जर नवीन पॅन कार्ड क्यूआर कोड सक्षम आहेत तर जुनी कार्डे तशीच कार्यरत राहतील का?
ii क्यूआर कोड आम्हाला कशासाठी मदत करेल?
i. QR कोड हे नवीन वैशिष्ट्य नाही आणि ते 2017-18 पासून पॅन कार्डमध्ये समाविष्ट केले गेले आहे. पॅन 2.0 प्रकल्पांतर्गत सुधारणांसह (डायनॅमिक क्यूआर कोड जो पॅन डेटाबेसमध्ये नवीनतम डेटा प्रदर्शित करेल). क्यूआर कोडशिवाय जुने पॅन कार्ड असलेल्या पॅन धारकांना सध्याच्या पॅन 1.0 इको-सिस्टीममध्ये तसेच पॅन 2.0 मध्ये क्यूआर कोडसह नवीन कार्डसाठी अर्ज करण्याचा पर्याय आहे.
ii.क्यूआर कोड पॅन आणि पॅन तपशील प्रमाणित करण्यात मदत करतो.
iii सध्या, क्यूआर कोड तपशीलांच्या पडताळणीसाठी विशिष्ट क्यूआर रीडर ऍप्लिकेशन उपलब्ध आहे. रीडर ॲप्लिकेशनद्वारे वाचल्यावर संपूर्ण तपशील म्हणजे फोटो, स्वाक्षरी, नाव, वडिलांचे नाव / आईचे नाव आणि जन्मतारीख प्रदर्शित केली जाते.
प्रश्न 8
"निर्दिष्ट क्षेत्रातील सर्व व्यवसाय-संबंधित क्रियाकलापांसाठी सामान्य व्यवसाय अभिज्ञापक(कॉमन बिझनेस आयडेंटिफायर) "? काय आहे ?
केंद्रीय अर्थसंकल्प 2023 मध्ये अशी घोषणा करण्यात आली होती की व्यावसायिक आस्थापनांसाठी पॅन असणे आवश्यक आहे, निर्दिष्ट सरकारी एजन्सींच्या सर्व डिजिटल प्रणालींसाठी पॅनचा वापर सामान्य ओळखकर्ता म्हणून केला जाईल.
प्रश्न 9
कॉमन बिझनेस आयडेंटिफायर विद्यमान युनिक टॅक्सपेअर आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजेच पॅन ची जागा घेईल का?
नाही. पॅन स्वतःच कॉमन बिझनेस आयडेंटिफायर म्हणून वापरला जाईल.
प्रश्न 10
"युनिफाइड पोर्टल" चा अर्थ काय आहे?
सध्या पॅन संबंधित सेवा तीन वेगवेगळ्या पोर्टलवर उपलब्ध केल्या जातात. पॅन 2.0 प्रकल्पामध्ये सर्व पॅन/टॅन संबंधित सेवा आयटीडीच्या एकाच युनिफाइड पोर्टलवर उपलब्ध केल्या जातील. या पोर्टलवर पॅन आणि टॅनशी संबंधित सर्व एंड-टू-एंड सेवा जसे की वितरण, अपडेट, दुरुस्ती, ऑनलाइन पॅन प्रमाणीकरण (ओपीव्ही), तुमचा एओ जाणून घ्या, आधार-पॅन लिंकिंग, तुमचा पॅन सत्यापित करा, ई-पॅनसाठी विनंती, पॅन कार्ड इ.ची पुनर्मुद्रण करण्याची विनंती, इत्यादी उपलब्ध केल्या जातील, ज्यामुळे प्रक्रिया आणखी सुलभ होतील आणि पॅन सेवा वितरणात होणारा विलंब टळेल. अर्ज प्राप्त करण्याच्या विविध पद्धतींमुळे (ऑनलाइन ई केवायसी /ऑनलाइन पेपर मोड/ऑफलाइन) तक्रारींचे निवारण इ.विलंब टाळता येतील.
प्रश्न 11
एकापेक्षा जास्त पॅन असलेल्या लोकांसाठी, तुम्ही अतिरिक्त पॅन कसे ओळखाल आणि काढून टाकाल?
प्राप्तिकर कायदा, 1961 च्या तरतुदींनुसार, कोणतीही व्यक्ती एकापेक्षा जास्त पॅन ठेवू शकत नाही. एखाद्या व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त पॅन असल्यास, त्याने/तिने ते अधिकार क्षेत्रीय मूल्यांकन अधिकाऱ्याच्या निदर्शनास आणून देणे आणि अतिरिक्त पॅन हटवणे/निष्क्रिय करणे बंधनकारक आहे.
पॅन 2.0 मध्ये, पॅन साठी संभाव्य डुप्लिकेट विनंत्या ओळखण्यासाठीच्या सुधारित सिस्टम लॉजिकमुळे आणि डुप्लिकेट्सचे निराकरण करण्यासाठी केंद्रीकृत आणि वर्धित यंत्रणेमुळे एका व्यक्तीने एकापेक्षा जास्त पॅन धारण केल्याच्या घटना कमी होतील.
NC/ST/Shailesh/Sanjana/Nandini/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2077748)
Visitor Counter : 23