माहिती आणि प्रसारण मंत्रालय
55व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात एक अनोखा सिनेमॅटिक अनुभव : ‘द रुस्टर’ प्रदर्शित
"अंधारातून प्रकाशाचा शोध घेणारा हा चित्रपट, छोट्या छोट्या क्षणांनी आपली ओळख निर्माण करतो:" दिग्दर्शक मार्क लिओनार्ड विंटर
'सर्वसारखी कथा असूनही आपलीच सामायिक असुरक्षा प्रतिबिंबित करते:" प्रमुख अभिनेता ह्यूगो विव्हिंग
“हा चित्रपट प्रेमासाठी केलेले परिश्रम दाखवतो, भारतातील प्रेक्षकांचा उत्साही प्रतिसाद पाहून आम्हाला खूप आनंद झाला" : निर्माता गेराल्डिन हॅकविल
#IFFIWood, 25 नोव्हेंबर 2024
55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा (इफ्फी)मध्ये ऑस्ट्रेलियन चित्रपट 'द रुस्टर'चे आज प्रदर्शन करण्यात आले. यंदा या महोत्सवामध्ये ऑस्ट्रेलियन चित्रपटावर विशेष लक्ष केंद्रीत केले गेले आहे. दिग्दर्शक आणि लेखक मार्क लिओनार्ड विंटर, प्रमुख अभिनेता ह्यूगो वीव्हिंग आणि निर्माते गेराल्डिन हॅकविल आणि महवीन शाहराकी यांच्यासह चित्रपटाच्या क्रिएटिव्ह टीमने चित्रपट तयार करताना आलेले त्यांचे अनुभव सांगितले. यावेळी सर्व टीमने आपल्या कथाकथनामधील अंतर्दृष्टी सामायिक केली.
दिग्दर्शक मार्क लिओनार्ड विंटर यांनी या फीचर फिल्मने आपण पूर्ण लांबीच्या कथापट क्षेत्रात पदार्पण करत असून, हा चित्रपट भारतीय प्रेक्षकांसमोर सादर करण्यासाठी आपण खूप उत्सुक असल्याचे नमूद केले, “हा एक अतिशय वैयक्तिक प्रकल्प होता. आमच्या गॅरेजमध्ये तो बनवला. यासाठी आमच्या छोट्या ,अगदी घट्ट विण असलेल्या टीमने काम केले, असे सांगून विंटर म्हणाले, "आता भारतातील या प्रतिष्ठित महोत्सवात हा चित्रपट सादर करणे म्हणजे आमचा खरा सन्मान आहे.”
‘द रुस्टर’ मध्ये डॅन या तरुण पोलिस अधिकाऱ्याची कथा सांगितली आहे. डॅन त्याचा जिवलग मित्र स्टीव्हच्या मृत्यूनंतर जंगलात जातो. जंगलात त्याला एक एकांतवासीय संन्यासी भेटतो. ज्याच्याकडे स्टीव्हच्या रहस्यमयी मृत्यूची उत्तरे कदाचित असू शकतील, असे डॅनला वाटते. हा चित्रपट दु:ख, अपरिमित हानी आणि अर्थपूर्ण संघर्ष या संकल्पनां सोपानांमधून उलगडतो. चित्रपटातील पात्रांच्या भावनिक खोलीचा अत्यल्प परंतु शक्तिशाली अशा कथाकथनाद्वारे शोध घेतला जातो.
चित्रपटाचा मुख्य अभिनेता ह्यूगो वीव्हिंग याने काम करतानाचा अनुभव व्यक्त केला. याआधी विंटरसोब केल्यावर, विव्हिंगने या प्रक्रियेचे वर्णन आनंददायक आणि खोल अर्थपूर्ण असे केले. “भूमिका साकारणे हा एक आव्हानात्मक होते पण प्रकल्प लाभदायक ठरल्याचा अनुभव आला, असेही या कलाकाराने नमूद केले.
निर्माते, गेराल्डिन हेकविल आणि महवीन शहारकी यांनीही चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेबद्दल त्यांचे विचार मांडले. हॅकविलने अभिनेत्यापासून दिग्दर्शकापर्यंत विंटरने केलेल्या प्रगतीबद्दल अभिमान व्यक्त केला. आणि नमूद केले की, “मार्कने स्क्रिप्ट आणि दिग्दर्शनावरील त्याच्या कामामुळे आमच्या अपेक्षेपेक्षा खूप मोठा आणि पुढचा पल्ला गाठला होता. या प्रवासाचा भाग बनणे ही आमच्यासाठी एक विशेष गोष्ट ठरली.”
पत्रकार परिषदेत चित्रपटाचे ध्वनी संरेखन हे आणखी एक वैशिष्ट्य असल्याचे सांगितले गेले. दिग्दर्शक विंटर यांनी चित्रपटाच्या स्कोअरमधील प्राथमिक घटक म्हणून आवाजाचा अभिनव वापर स्पष्ट केला. “आम्हाला हा स्कोअर मानवी अनुभवाशी सखोलपणे जोडला गेला पाहिजे, फक्त आवाजाचा वापर करून भावना जागृत कराव्यात, प्राथमिक आवाजापासून ते दैवी संगीतापर्यंत. मानवी आवाजात एक अनोखी शक्ती आहे आणि आपल्याला ऊर्जा मिळवणे आवश्यक होते,” असे विंटर यांनी स्पष्ट केले.
ऑस्ट्रेलियन चित्रपटसृष्टीचे भविष्य, स्वतंत्र चित्रपट निर्मात्यांसमोरील आव्हाने आणि चित्रपट वितरणातील डिजिटल प्लॅटफॉर्मची वाढती भूमिका यावर चर्चा करून पत्रकार परिषदेचा समारोप झाला. क्रिएटिव्ह टीमने बदलत्या तांत्रिक ‘लँडस्केप’ची पर्वा न करता कथाकथनाचे सार टिकवून ठेवण्याच्या महत्त्वावर भर दिला.
55 व्या इफ्फीमध्ये विविध सिनेमॅटिक अभिव्यक्ती साजरी करत असताना, द रुस्टर स्वतंत्र चित्रपट निर्मितीच्या सामर्थ्याचा आणि जगभरातील प्रेक्षकांना जोडणाऱ्या सार्वत्रिक संकल्पनेचा पुरावा असल्याचे मानले जात आहे.
संपूर्ण पत्रकार परिषद पाहण्यासाठी येथे क्लिक करावे:
* * *
PIB IFFI CAST AND CREW | G.Chippalkatti/Suvarna/Darshana | IFFI 55
(Release ID: 2077008)
Visitor Counter : 14