माहिती आणि प्रसारण मंत्रालय
रंगमंचापासून ते सिनेमापर्यंत: “पुणे हायवे” कालातीत कथाकथनाला जिवंत करते
"मैत्री, विश्वासघात आणि पापविमोचन 'पुणे हायवे' आपल्याला परिभाषित करणाऱ्या पर्यायांचा शोध घेते." - अमित साध
"रंगमंचापासून ते पडद्यापर्यंतचा प्रवास आव्हानात्मक होता, परंतु त्याचा परिणाम खरोखरच उत्कृष्ट आहे." - बग्स भार्गव, दिग्दर्शक आणि लेखक
"प्रामाणिकपणे सांगितलेली एक साधी कथा अडथळे पार करू शकते याचा हा चित्रपट पुरावा आहे." - राहुल डाकुन्हा, दिग्दर्शक आणि लेखक
#IFFIWood, 23 नोव्हेंबर 2024
‘पुणे हायवे’ चित्रपटाचे कलाकार आणि तंत्रज्ञ आज गोव्यात 55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात एका पत्रकार परिषदेसाठी एकत्र आले. चित्रपट निर्मात्यांनी त्यांची सर्जनशील प्रक्रिया, निर्मितीदरम्यान येणारी आव्हाने आणि चित्रपटाच्या भविष्यासाठी आपला दृष्टिकोन यावर चर्चा केली.
राहुल डिकुन्हा आणि बग्स भार्गव द्वारा दिग्दर्शित आणि लिखित पुणे हायवे हा एक भावनिक थ्रिलर आहे. यात अनपेक्षित परिस्थितींमध्ये पारखलेल्या मैत्रीच्या नाजूकपणाचा शोध घेणारी आकर्षक कथा आहे. जुन्या आठवणी, रहस्य आणि हृदय पिळवटून टाकणाऱ्या नाट्याच्या उत्कृष्ट मिश्रणासह हा चित्रपट खोल मानवी संबंधांचे आणि त्यांच्या गुंतागुंतीचे सार उलगडून दाखवतो. चित्रपटातील भयावह दृश्यांमुळे एक सिनेमॅटिक अनुभव निर्माण होतो जो श्रेयनामावली नंतरही बराच काळ टिकतो.
मूळ स्वरूपात एका खोलीतील नाटक अशी कल्पना होती जे विविध नऊ देशांमध्ये सादर करण्यात आले त्या पुणे हायवे ला सिनेमॅटिक प्रकारात चपखल बसवण्यासाठी त्यात एक सर्जनशील बदल करण्यात आला. नाटक आणि चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन करणारे राहुल दाकुन्हा यांनी मोठ्या पडद्यासाठी त्याची व्याप्ती वाढवण्याबाबतचे विचार सामायिक केले.
“आम्हाला सिनेमासाठी नाटकाचा मूळ गाभा टिकवून ठेवत त्याच्या अंतरंगाची नव्याने कल्पना करावी लागली,” असे दकुन्हा यांनी स्पष्ट केले. "ही मैत्री आणि पृष्ठभागाखाली लपलेल्या भेगांची कथा आहे."
सह-दिग्दर्शक बग्स भार्गव यांनी चित्रपटाच्या निर्मितीसाठी केलेले सहकार्यात्मक प्रयत्न अधोरेखित केले. 'हा चित्रपट प्रेमाची परिणीती आहे, ज्यात कथाकथनाचा अनेक वर्षांचा अनुभव आणि काहीतरी सार्वकालिक बनवण्याचा दृढ निर्धार आहे," असे ते म्हणाले.
अशा आगळ्यावेगळ्या प्रकल्पाचा भाग झाल्याबद्दल प्रसिद्ध अभिनेते अमित साध यांनी आनंद व्यक्त केला. “ही भूमिका साकारणे हा माझ्या कारकिर्दीतील सर्वात आव्हानात्मक आणि लाभदायक अनुभव आहे. ही एक कथा आहे जी प्रत्येकाशी बोलते ज्यांनी मैत्रीची नेहमीच कदर केली आहे,” ते म्हणाले.
मंजरी फडणीस यांनी चित्रपटातील सार्वत्रिक मुद्द्यांवर आपले विचार मांडले. “पुणे हायवे हा थरारकपेक्षा अधिक आहे; मानवी नातेसंबंधांचा आणि जीवनात बदल घडवणाऱ्या घटनांना तोंड देताना आपण केलेल्या निवडींचा हा मार्मिक शोध आहे,” त्या म्हणाल्या.
“हा एक असा चित्रपट आहे जो प्रत्येकाशी अनुवाद साधतो — कारण त्याच्या मुळाशी नातेसंबंध आणि निवडी आहेत ज्या आपल्याला परिभाषित करतात,” निर्मात्या सीमा महापात्रा म्हणाल्या.
पुणे हायवेचे सार्वत्रिक संकल्पनेसाठी कौतुक केले गेले, ज्यामुळे तो विविध संस्कृतींच्या प्रेक्षकांशी जोडला गेला आहे. यातील गूढरम्यता आणि भावनिक सखोलता यांच्या मिश्रणाने या वर्षीच्या गोवा इफ्फीमध्ये त्याने एक उत्कृष्ट प्रवेश म्हणून आगळे स्थान पटकावले आहे. चित्रपटाच्या महोत्सवांपलीकडील प्रवासाबद्दल चित्रपट निर्माते आशावादी आहेत, प्रेक्षकांपर्यंत व्यापकपणे पोहोचण्यासाठी तो जागतिक मंचावर प्रदर्शित करण्याची त्यांची योजना आहे. पात्रांच्या जीवनातील आणि कथेतील न सुटलेल्या रहस्यांचा सखोल अभ्यास करण्याचे आश्वासन देऊन दिग्दर्शकांनी सिक्वेलचाही संकेत दिला.
“पुणे हायवे जगासोबत सामायिक करण्यास आम्ही उत्सुक आहोत. ही एक अशी कथा आहे जी प्रत्येकाने सांगायला आणि ऐकायला हवी,” सह-निर्मात्या जहांआरा भार्गव म्हणाल्या.
भारतीय चित्रपट मैत्री आणि तिची गुंतागुंतीची गतिशीलता कशी चित्रित करतो हे नव्याने परिभाषित करत पुणे हायवेने जगभरातील प्रेक्षकांवर कायमस्वरूपी छाप सोडण्याचे आश्वासन दिले आहे.
पत्रकार परिषदेची लिंक:
* * *
PIB IFFI CAST AND CREW | S.Patil/Sushma/Nandini/Darshana | IFFI 55
(Release ID: 2076472)
Visitor Counter : 10