संरक्षण मंत्रालय
भारतीय नौदलासाठी युनिकॉर्न मास्ट’ची संयुक्तपणे निर्मिती करण्यासाठी भारत आणि जपानमध्ये अंमलबजावणीविषयक परस्पर सामंजस्य करारावर स्वाक्षरी
Posted On:
16 NOV 2024 2:19PM by PIB Mumbai
भारतीय नौदलाच्या जहाजांवरील फिटमेंटकरता युनिकॉर्न मास्ट’ची संयुक्तपणे निर्मिती करण्यासाठी भारत आणि जपानमध्ये काल अंमलबजावणीविषयक परस्पर सामंजस्य करार झाला. जपानमध्ये टोकियो इथल्या भारतीय दूतावासात काल दि. 15 नोव्हेंबर 24 रोजी दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी या अंमलबजावणीविषयक सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
जपानमधील भारताचे राजदूत सिबी जॉर्ज आणि जपानच्या संरक्षण मंत्रालयांतर्गतच्या अॅक्विजिशन टेक्नॉलॉजी अँड लॉजिस्टिक्स एजन्सीचे (ATLA) आयुक्त इशिकावा ताकेशी यांनी यासंदर्भात काल झालेल्या कार्यक्रमात दोन्ही देशांच्या वतीने या करारावर स्वाक्षऱ्या केल्या, आणि स्वाक्षरीकृत करारांची परस्पर देवाणघेवाण केली.
युनिफाइड कॉम्प्लेक्स रेडिओ अँटेना (UNICORN) हा एकात्मिक संप्रेषण प्रणालीयुक्त मास्ट अर्थात मनोरा असणार आहे. यामुळे लपून केल्या जाणाऱ्या कृती टिपण्याच्या आणि त्यांचा माग काढण्याच्या नौदलाच्या वैशिष्ट्यांमध्ये सुधारणा होऊ शकणार आहे.
या प्रगत प्रणालींचा आपल्या व्यवस्थेत अंतर्भाव करण्यासाठी करण्यासाठी भारतीय नौदलाचे काम वेगाने सुरु आहे, आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही कंपनी जपानच्या सहकार्याने भारतातच या प्रणालीची निर्मिती करणार आहे.
ही प्रणाली प्रत्यक्षात कार्यरत झाल्यानंतर, भारत आणि जपान यांच्यामधील संरक्षण उपकरणे संयुक्तपणे विकसित करणे / निर्मिती करण्याच्या प्रयत्नांमधला हा पहिलाच प्रत्यक्षात उतरलेला प्रयत्न ठरणार आहे.
***
M.Pange/T.Pawar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2073898)
Visitor Counter : 35