उपराष्ट्रपती कार्यालय
उपराष्ट्रपतींकडून देशवासियांना गुरू नानक जयंतीच्या शुभेच्छा
Posted On:
14 NOV 2024 8:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 नोव्हेंबर 2024
गुरू नानक देव यांच्या 555 व्या जयंतीनिमित्त मी सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो.
गुरू नानक यांचे जीवन ज्ञानप्राप्तीचे पथदर्शक असून आपल्याला अध्यात्मिक समाधान, समानता, करुणा आणि मानवतेच्या सेवेचा मार्ग दाखवते.
या पवित्र प्रसंगी गुरू नानक देव यांच्या कालातीत ज्ञानाप्रती आपली वचनबद्धता दृढ करून सत्य, सुसंवाद आणि सर्व प्राणिमात्रांच्या ऐक्यासाठी स्वतःला पुन्हा समर्पित करूया.
समावेशी आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी अथक कार्यरत राहण्यासाठी त्यांची शिकवण आपल्याला प्रेरणादायी ठरो.
S.Kane/R.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2073470)
Visitor Counter : 43