विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (आयआयएसएफ) 2024च्या नांदी कार्यक्रमाचे आयोजन
Posted On:
12 NOV 2024 8:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर 2024
सीएसआयआर- राष्ट्रीय वैज्ञानिक संवाद आणि धोरण संशोधन संस्थेतर्फे (एनआयएससीपीआर) आज पुसा परिसरातील विवेकानंद सभागृहात भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (आयआयएसएफ) 2024 च्या कर्टन रेझर म्हणजेच नांदी- कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासह या भव्य विज्ञान महोत्सवाची सुरुवात झाली.
सीएसआयआर-एनआयएससीपीआरच्या संचालिका प्रा.रंजना अगरवाल यांनी महोत्सवाची वातावरणनिर्मिती करत स्वागतपर भाषण केले. त्या म्हणाल्या, “भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाच्या 10 व्या वर्षीच्या या कार्यक्रमात सर्वांचे स्वागत. या महत्त्वाच्या उत्सवाची माहिती विज्ञान शाखेच्या सर्व विद्यार्थ्यांना मिळावी हा आजच्या या नांदी कार्यक्रमाचा उद्देश आहे. आयआयएसएफ 2024 मध्ये चंद्राच्या प्रतिकृतीसारख्या अनेक नाविन्यपूर्ण गोष्टींचे प्रदर्शन मांडले जाईल जे सर्व सहभागींच्या विशेषतः विद्यार्थ्यांच्या आकर्षणाचा विषय असेल.”
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले नवी दिल्लीच्या युजीसी-आंतर विद्यापीठीय प्रवेगक केंद्राचे संचालक प्रा.ए.सी.पांडे यांनी उपस्थितांना संबोधित करताना राष्ट्र उभारणीत विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (एसटीईएम) यांतील शिक्षणाला चालना देऊन अभिनव संशोधनाला प्रोत्साहन देणे आणि भारताच्या वैज्ञानिक कौशल्याचे दर्शन घडवणे हा या आयआयएसएफ 2024 च्या आयोजनाचा मुख्य उद्देश आहे.
सीएसआयआर-एनआयएससीपीआरमध्ये कार्यरत वैज्ञानिक डॉ.मनीष मोहन गोरे यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे संचलन केले. तसेच विद्यार्थी आणि तज्ञ संवाद सत्रात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत केली. सीएसआयआर-एनआयएससीपीआरमधील शास्त्रज्ञ डॉ.मेहेर वान यांनी आभारप्रदर्शन करताना उपस्थित मान्यवर, आयोजक तसेच सहभागींविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
S.Bedekar/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2072876)
Visitor Counter : 33