संरक्षण मंत्रालय
मोझांबिक’ला नकाला येथे दोन इंटरसेप्टर्स करण्यात आले सुपूर्द
Posted On:
09 NOV 2024 7:17PM by PIB Mumbai
हिंद महासागर प्रदेशात मैत्रीपूर्ण राष्ट्रांसोबत क्षमता वाढवण्याच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून, केंद्र सरकारने 8 नोव्हेंबर 2024 रोजी मोझांबिक सरकारला दोन वॉटर - जेट प्रॉपल्ड फास्ट इंटरसेप्टर क्राफ्ट भेट म्हणून दिले. फास्ट इंटरसेप्टर क्राफ्ट भारतातून आयएनएस घडियालमधून पाठवण्यात आले.
हस्तांतरण समारंभाला मोझांबिकमधील भारताचे उच्चायुक्त रॉबर्ट शेटकिन्टोंग, मापुतो येथील भारताचे नवनियुक्त संरक्षण सल्लागार कर्नल पुनीत अत्री आणि आयएनएस घडियालचे कमांडिंग अधिकारी कमांडर राजन चिब उपस्थित होते. मोझांबिकचे राष्ट्रीय संरक्षण मंत्रालयाचे स्थायी सचिव ऑगस्टो कासिमिरो मुइओ यांनी मोझांबिक सरकारच्या वतीने औपचारिकपणे जहाजे स्वीकारली.
या वॉटर - प्रोपेल्ड जहाजांचा सर्वोच्च वेग 45 नॉट्स असून 12 नॉट्स वेगाने 200 नॉटिकल मैल अंतर पार करण्याची क्षमता आहे. ती पाच कर्मचाऱ्यांचा ताफा घेऊन जाऊ शकतात तसेच मशीन गन आणि बुलेट-प्रतिरोधक केबिनने ती सुसज्ज आहेत. दोन फास्ट इंटरसेप्टर जहाजे सागरी दहशतवाद आणि काबो डेलगाडो प्रांतात सुरु असलेल्या बंडखोरीचा सामना करण्यात मोझांबिक सरकारला महत्वपूर्ण मदत करतील. यापूर्वी, सागरी सुरक्षेसाठी मोझांबिक सरकारच्या प्रयत्नांना गती देण्यासाठी, भारत सरकारने 2019 मध्ये दोन मोठी इंटरसेप्टर जहाजे आणि जानेवारी 2022 मध्ये त्याच श्रेणीची दोन फास्ट इंटरसेप्टर जहाजे भेट दिली होती.
भारत आणि मोझांबिक यांच्यात एक मजबूत धोरणात्मक भागीदारी आहे, जी विविध क्षेत्रांमध्ये वर्षांगणिक अधिक मजबूत होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्थन असलेल्या, क्षेत्रातील सर्वांसाठी सुरक्षा आणि विकास (SAGAR) संकल्पनेनुसार हिंद महासागर क्षेत्रातील आपल्या सागरी शेजारी देशांना मदत आणि पाठिंबा देण्यासाठी भारत पूर्णपणे वचनबद्ध आहे.
***
M.Pange/S.Kane/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2072080)
Visitor Counter : 37