अर्थ मंत्रालय
सीबीडीटीने प्राप्तिकर नियमावली, 1962च्या नियम 10सीएच्या उपनियम(7) च्या तरतुदीनुसार 2024-25 या मूल्यांकन वर्षासाठी हस्तांतरण मूल्यनिश्चितीसाठी सहनशीलता सीमा अधिसूचित केली
सहनशीलता सीमा अधिसूचनेमुळे करदात्यांना निश्चितता मिळेल आणि हस्तांतरण मूल्यनिश्चितीच्या व्यवहारांच्या मूल्यनिश्चितीशी संबंधित जोखमीची चिंता कमी होईल
Posted On:
29 OCT 2024 6:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर 2024
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने(सीबीडीटी) 18 ऑक्टोबर 2024 रोजी अधिसूचना क्रमांक 116/2024 जारी केली आहे. या अधिसूचनेत मूल्यांकन वर्ष 2024-25 साठी सहनशीलता सीमा अधिसूचित करण्यात आली आहे. सहनशीलता सीमेची अधिसूचना करदात्यांना निश्चितता प्रदान करेल आणि हस्तांतरण मूल्यनिश्चितीच्या व्यवहारांच्या मूल्यनिश्चितीशी संबंधित जोखमीची चिंता कमी करेल.
नियम 10 सीएच्या उपनियम (7) मधील तरतुदीनुसार जर अशा प्रकारे निर्धारित केलेले समांतर मूल्य ज्यावर आंतरराष्ट्रीय व्यवहार किंवा विनिर्दिष्ट स्थानिक व्यवहार प्रत्यक्षात करण्यात आले आहेत त्यामधील तफावत अशा प्रकारच्या टक्केवारीपेक्षा जास्त नसेल आणि स्थानिक व्यवहारांच्या तीन टक्क्यांपेक्षा जास्त नसेल जे या संदर्भात केंद्र सरकारच्या अधिकृत राजपत्रात अधिसूचित असेल ज्या मूल्यावर आंतरराष्ट्रीय किंवा विनिर्दिष्ट स्थानिक व्यवहार प्रत्यक्षात झाले असतील ते समांतर मूल्य मानले जाईल.
हस्तांतरणासाठी सहनशीलता सीमा खालीलप्रमाणे आहेः
- गेल्या वर्षी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार ‘घाऊक व्यापार’ स्वरुपातील व्यवहारावर सहनशीलता सीमा 1% आणि इतरांसाठी 3% असेल.
- ‘घाऊक व्यापार’ या शब्दाची व्याख्या एक आंतरराष्ट्रीय व्यवहार किंवा मालाच्या व्यापाराचा विनिर्दिष्ट स्थानिक व्यवहार म्हणून केली जाईल जो खालील अटींची पूर्तता करेल:
- तयार मालाचा खरेदी खर्च अशा व्यापारी व्यवहारांच्या एकूण खर्चाच्या 80% किंवा त्यापेक्षा जास्त असेल; आणि
- मालाची सरासरी मासिक क्लोजिंग इन्व्हेन्टरी अशा व्यापारी व्यवहाराशी संबंधित विक्रीच्या 10% किंवा त्यापेक्षा कमी असेल.
* * *
N.Chitale/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2069323)
Visitor Counter : 32