वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या स्टार्टअप क्रांतीची घोषणा करण्यासाठी डीपीआयआयटीने ने एचसीएल सॉफ्टवेअर सोबत केली भागीदारी


स्टार्टअप इंडिया उपक्रमांतर्गत, डीपीआयआयटीने आजवर उद्योग भागधारकांबरोबर केले 80 हून अधिक सामंजस्य करार

भारताच्या उत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि राष्ट्रीय उत्पादन केंद्र बनण्याच्या ध्येयाला पाठिंबा देण्यासाठी या भागीदारीचे प्रयोजन

Posted On: 25 OCT 2024 4:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर 2024

उद्योग आणि देशांतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (डीपीआयआयटी) ने 23 ऑक्टोबर 2024 रोजी नवी दिल्लीतील वाणिज्य भवन येथे सॉफ्टवेअर सोल्यूशन्समधील जागतिक स्तरावर अग्रणी असणाऱ्या एचसीएल सॉफ्टवेअर कंपनीसोबत,आपल्या मॅन्युफॅक्चरिंग इनक्युबेशन उपक्रमाचा एक महत्त्वाचा घटक म्हणून धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली. भारताच्या स्टार्टअप उत्पादन परिसंस्थेमध्ये क्रांती घडवून आणण्याच्या प्रयत्न म्हणून, कॉर्पोरेट कंपन्या उत्पादन स्टार्टअप्समध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील असे वातावरण डीपीआयआयटी तयार करत आहे. स्टार्टअप इंडिया उपक्रमांतर्गत, डीपीआयआयटीने आजवर विविध उद्योग भागधारकांबरोबर 80 हून अधिक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली आहे.

स्टार्टअप्सना जागतिक बाजारपेठेच्या उपलब्धतेसाठी HCL SYNC कार्यक्रमात भाग घेता येईल, त्यामुळे त्यांना त्यांची उत्पादने आणि सेवा जगभरात प्रदर्शित करता येतील,अशा प्रकारे भारतीय नवोन्मेष आंतरराष्ट्रीय उपभोक्त्यांपर्यंत पोहचवला जाईल.विशेष म्हणजे, हे सहकार्य भारतीय उत्पादन क्षेत्राच्या प्रगतीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल असून ते स्वतः ला राष्ट्रीय उत्पादन केंद्र म्हणून स्थापित करण्याच्या राष्ट्राच्या ध्येयाला पाठिंबा देते.                   

या उपक्रमाच्या उद्दिष्टांमध्ये स्टार्टअप्सना भारतासाठी तयार केलेली अनन्य उत्पादने आणि सोल्यूशन्स तयार करण्यासाठी प्रोत्साहित करून भारतीय बौद्धिक संपदा विकसित करणे, स्टार्टअप्सना जागतिक मानकांशी जुळणारी जागतिक दर्जाची उत्पादने तयार करण्यासाठी साधने आणि कौशल्य प्रदान करून उत्पादनाची गुणवत्ता सुधारणे आणि एक मजबूत उत्पादन परिसंस्था निर्माण करणे, पूर्ण उत्पादन मूल्य साखळीला समर्थन देण्यास सक्षम असलेले परस्पर जोडलेले स्टार्टअप आणि पुरवठादारांचे नेटवर्क स्थापित करणे यांचा समावेश आहे.

डीपीआयआयटीचे सहसचिव संजीव सिंग यांनी, शाश्वत उत्पादन परिसंस्था स्थापन करण्यासाठी या भागीदारीची गरज या कार्यक्रमात अधोरेखित केली. स्टार्टअप्सना समर्थन देण्याचे एचसीएल सॉफ्टवेअरचे कौशल्य आणि समर्पण, डीपीआयआयटीच्या दृष्टीकोनाशी अखंडपणे संरेखित आहे, असेही ते म्हणाले.

Jaydevi PS/S.Mukhedkar/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 




(Release ID: 2068100) Visitor Counter : 30


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil