अर्थ मंत्रालय
राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी, नागपूर येथे 25 ऑक्टोबरला ‘उत्तरायण-2024’ या प्रशिक्षण वर्गाचा समारोप
प्रविष्टि तिथि:
24 OCT 2024 8:48PM by PIB Mumbai
नागपूर,24 ऑक्टोबर 2024
प्राप्तिकर अधिकाऱ्यांमधून नव्याने बढती मिळणाऱ्या अधिकाऱ्यांना भारतीय महसूल सेवेतील ‘सहायक आयुक्त’ या पदासाठी व कर प्रशासनाच्या व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी, नागपूर येथे दिल्या जाणाऱ्या 'उत्तरायण-2024' या प्रशिक्षणवर्गाच्या समारोप समारंभाचे उद्या 25 ऑक्टोबर शुक्रवार रोजी सकाळी 11.30 वाजता आयोजन करण्यात आले आहे. या समारोप समारंभास सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास शिरपूरकर हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहतील.
राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी ही भारतीय महसूल सेवेतील (आय.आर.एस.) अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणारी अग्रणी संस्था आहे. 7 आठवडे चाललेल्या या प्रशिक्षणात प्रत्यक्ष कर वसुली व करचुकवेगिरीला आळा घालण्याच्या प्रमुख कार्याच्या प्रशिक्षणाशिवाय अधिकाऱ्यांना पैशाच्या गैरव्यवहारासारख्या आर्थिक गुन्हे व विविध आर्थिक घोटाळे यांचा सामना करण्यासाठी सक्षम केले जाते.प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांच्या शारिरिक सुदृढतेवरही पुरेसा भर दिला जातो. अकादमीमध्ये असणाऱ्या व्यायामशाळा , आधुनिक जलतरण तलाव व उत्कृष्ट क्रीडा सुविधांचा वापर करण्यासाठी अधिकाऱ्यांना प्रोत्साहन दिले जाते.निवासी प्रशिक्षण कार्यक्रमानंतर एक आठवडा ‘भारत-दर्शन’आणि प्रत्यक्ष कामाच्या प्रशिक्षणाची संधीही या अधिकाऱ्यांना मिळते.
समारोप समारंभाला नागपूर आयकर विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
S.Rai/D.Wankhade/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2067946)
आगंतुक पटल : 66
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English