संरक्षण मंत्रालय
भारतीय नौदल आणि ओमानच्या नौदलाचा (रॉयल नेव्ही) संयुक्त सागरी सराव (नसीम - अल - बहर)
Posted On:
20 OCT 2024 5:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर 2024
आयएनएस त्रिकंद आणि सागरी क्षेत्रातील हवाई गस्तीच्या डॉर्निअर विमाने आणि ओमानच्या नौदलाचे (Royal Navy) अल सीब हे जहाज यांच्या नसीम - अल - बहर हा द्विपक्षीय संयुक्त सराव नुकताच पार पडला. 13 ते 18 ऑक्टोबर 2024 या कालावधीत गोवा इथे या सरावाचे आयोजन करण्यात आले होते.
हा द्विपक्षीय संयुक्त सराव दोन टप्प्यामध्ये पार पडला. याअंतर्गत 13 ते 15 ऑक्टोबर 2024 या कालावधी दरम्यान झालेल्या पहिल्या टप्प्यात बंदराच्या ठिकाणी सरावा अंतर्गतचे उपक्रम राबवले गेले, तर या कालावधीत हार्बर टप्पा आणि त्यानंतर सागरी क्षेत्रातील सरावा अंतर्गतचे उपक्रम राबवले गेले.
या सरावा अंतर्गच्या उपक्रमांचा एक भाग म्हणून, दोन्ही देशांच्या नौदलांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये त्यांच्या कामाविषयक संवादांचेही आयोजन करण्यात आले होते. यात विविध विषयांमधल्या तज्ञतेची देवाण घेवाणि, तसेच नियोजन विषयक परिषदांचा समावेश होता. या सोबतच या संयुक्त द्विपक्षीय सरावाच्या निमित्ताने विविध क्रीडा स्पर्धा आणि सामाजिक कार्यक्रमांचेही आयोजित करण्यात आले होते.
या संयुक्त द्विपक्षीय सरावाअंतर्गत 16 ते 18 ऑक्टोबर 24 या कालावधीत सागरी क्षेत्रात झालेल्या सरावाच्या टप्प्यादरम्यान, दोन्ही देशांच्या जहाजांनी भूपृष्ठावरील लक्ष्य भेदणे, कमी पल्ल्याच्या अंतरातील विमान प्रतिरोधक गोळीबार, युद्ध सराव आणि समुद्रातील जहाजांमध्ये इंधनाचा पुनर्भरणा करण्यासारख्या (Replenishment at Sea Approaches - RASAPS) असंख्य अभिनव उपक्रमांमध्ये सहभाग घेतला. भारताच्या आएएनस त्रिकंदवर तैनात हेलिकॉप्टर आणि ओमान नौदलाच्या अल सीब या जहाजाने क्रॉस - डेक लँडिंग तसेच हवेतून इंधनाचा पुनर्भरणा करण्यासारख्या (Vertical replenishment - VERTREP) सराव उपक्रमांमध्ये सहभाग घेतला.
यासोबतच भारतीय नौदलाच्या सागरी क्षेत्रातील हवाई गस्तीच्या डॉर्निअर विमानांनी सरावात सहभागी झालेल्या जहाजांनी आकाशातील लक्ष्य भेदासाठी (Over-the-Horizon Targeting - OTHT)) आवश्यक माहिती पुरवण्याच्या सराव उपक्रमात सहभाग घेतला. दोन्ही देशांमध्ये जहाजांचे परस्पर समन्वयी कार्यान्वय करण्याचा सरावही यावेळी पार पडला याअंतर्गत भारतीय नौदलाच्या सागरी आरोहकांनी ओमान नौदलाच्या अल सीब या जहाजावर काम केले. अशा प्रकारच्या विविध उपक्रमांचा समावेश असलेल्या संयुक्त द्विपक्षीय सराव दोन्ही देशांच्या नोदलांमध्ये परस्पर समन्वयित कार्यान्वय अधिक मजबूत होण्यात तसेच परस्परांच्या सर्वोत्तम कार्यपद्धती समजून घेण्यात उपयुक्त ठरला.
भारत आणि ओमान या दोन्ही देशांच्या नौदलांमधील हा संयुक्त द्विपक्षीय सराव यशस्वीपणे पार पडला. त्याचवेळी या सरावाअंतर्गत भारतीय नौदल आणि ओमानचे नौदल या दोन्हींमधल्या परस्पर समन्वयित कार्यान्वयात अधिक सुधारणा घडवून आणणे, परस्परांच्या सर्वोत्तम कार्यपद्धती समजून घेणे आणि परस्पर सामंजस्य अधिक दृढ करण्याच्या उद्देशही साध्य झाला.
या सरावामुळे हिंद महासागर क्षेत्रातील समविचारी देशांसोबत परस्पर रचनात्मक सहकार्य आणि परस्पर सामाईक विकासासाठी भारताची वचनबद्धताही पुन्हा एकदा ठळकपणे अधोरेखित केली.
* * *
H.Akude/T.Pawar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2066524)
Visitor Counter : 66