श्रम आणि रोजगार मंत्रालय
कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या निव्वळ सदस्य संख्येत ऑगस्ट 2024 मध्ये 18.53 लाख सदस्यांची भर
Posted On:
20 OCT 2024 5:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर 2024
कर्मचारी भविष्य निधी संघटना (ईपीएफओ) ने ऑगस्ट 2024 साठी जारी केलेल्या तात्पुरत्या वेतनपट आकडेवारीनुसार ऑगस्ट 2024 मध्ये 18.53 लाख सदस्य ईपीएफओशी जोडले गेल्याचे दिसून येते. यात ऑगस्ट 2023 च्या तुलनेत 9.07 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे, जी रोजगाराच्या संधींमध्ये वाढ आणि कर्मचारी लाभांविषयी जागरूकता वाढल्याचे द्योतक आहे.
ईपीएफओने ऑगस्ट 2024 मध्ये सुमारे 9.30 लाख नवीन सदस्यांची नोंदणी केली, ज्यामध्ये मागील वर्षाच्या ऑगस्ट 2023 च्या तुलनेत 0.48% वाढ झाली आहे.
या डेटातील एक महत्त्वपूर्ण पैलू म्हणजे 18-25 वयोगटातील सदस्यांचे वर्चस्व हे होय.जे ऑगस्ट 2024 मध्ये एकूण नवीन सदस्यांपैकी 59.26% आहेत. याशिवाय, 18-25 वयोगटातील सदस्यांसाठी ऑगस्ट 2024 साठी निव्वळ वेतनपट आकडेवारी 8.06 लाख आहे.
वेतनपट आकडेवारीमधून असे दिसून येते की सुमारे 13.54 लाख सदस्य बाहेर पडले आणि नंतर ईपीएफओमध्ये पुन्हा सामील झाले. हे आकडे ऑगस्ट 2023 च्या तुलनेत 14.03% वार्षिक वाढ दर्शवतात.
वेतनपटाच्या लिंगनिहाय विश्लेषणानुसार असे आढळते की महिन्याभरात समाविष्ट नवीन सदस्यांपैकी सुमारे 2.53 लाख महिला सदस्य आहेत. हा आकडा ऑगस्ट 2023 च्या तुलनेत 3.75% वार्षिक वाढ दाखवतो. तसेच, महिन्याभरातील निव्वळ महिला सदस्यांची संख्या 3.79 लाख होती, जी ऑगस्ट 2023 च्या तुलनेत 10.41% वाढ दर्शवते.
वरील वेतनपट आकडेवारी तात्पुरती आहे कारण डेटा निर्मिती ही एक निरंतर प्रक्रिया आहे आणि कर्मचाऱ्यांची माहिती अद्ययावत करणे ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. मागील डेटा दर महिन्याला अद्ययावत केला जातो.
* * *
S.Kane/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2066521)
Visitor Counter : 58