दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

तंत्रज्ञानाच्या जबाबदार वापराबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी आयटीयू-डब्ल्यूटीएसए 2024 ने आयोजित केली ‘श्रवणाच्या सुरक्षित पद्धती (सेफ लिसनिंग)’ या विषयावरील कार्यशाळा


श्रवणाच्या असुरक्षित पद्धतींमुळे जगभरातील एक अब्जाहून अधिक तरुणांना श्रवणशक्ती कमी होण्याचा धोका असून तो टाळता येण्याजोगा आहे: जागतिक आरोग्य संघटना

Posted On: 18 OCT 2024 10:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर 2024

श्रवणशक्ती कमी होण्याचे जागतिक सार्वजनिक आरोग्यविषयक गंभीर संकट आणि श्रवणाच्या (ऐकणे) असुरक्षित पद्धतींमुळे उद्भवणारे धोके याबाबत जागृती करण्याच्या उद्देशाने, नवी दिल्ली येथे आयोजित  आयटीयू-डब्ल्यूटीएसए (आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ -जागतिक दूरसंचार मानकीकरण सभा ) 2024, मध्ये ‘श्रवणाच्या सुरक्षित पद्धती’ या विषयावर   आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ -जागतिक आरोग्य संघटना  यांची संयुक्त कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

श्रवणाच्या असुरक्षित पद्धतींमुळे 1 अब्जाहून अधिक तरुणांना श्रवणशक्ती कमी होण्याचा धोका असल्याचे, आकडेवारीसह स्पष्ट करून, या कार्यशाळेने श्रवणाच्या सुरक्षित पद्धती जागतिक मानक बनतील हे सुनिश्चित करण्यासाठी, सामूहिक कृतीचे महत्त्व अधोरेखित केले. सार्वजनिक आरोग्याच्या या वाढत्या समस्येला प्रतिसाद म्हणून, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) 2015 मध्ये ‘मेक लिसनिंग सेफ’ हा उपक्रम सुरू केला असून, श्रवण सुरक्षेद्वारे श्रवणशक्तीचा ऱ्हास (बहिरेपणा) रोखणे, हे याचे उद्दिष्ट आहे.

या कार्यशाळेत बोलताना ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे म्हणाल्या की, धोरणकर्त्यांनी आणि नियामकांनी, केवळ उत्पादकांसाठीच नव्हे, तर वापरकर्ते आणि सेवांसाठी देखील मानके विकसित करणे आवश्यक आहे. ''कॅलरी सेवन आणि दररोजची चाल यांसारख्या आरोग्याच्या इतर मापदंड पाळण्याच्या धर्तीवर श्रवणशक्ती जाणण्यासाठी शिक्षण आणि प्रशिक्षण असले पाहिजे,” असे त्यांनी सांगितले.

भारतातील जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यालयाचे उपप्रमुख पी. पेडेन म्हणाल्या, “श्रवण कमी होण्याचे गंभीर परिणाम म्हणजे संपर्क आव्हानांमध्ये, जीवनाची घसरलेली गुणवत्ता आणि व्यावसायिक विकास/शिक्षणावर संभाव्य परिणामांना तोंड.  हे लाखो लोकांमध्ये दिसून येत आहेत.

याशिवाय, लहान मुलांमध्ये उच्चरवामुळे श्रवणशक्ती कमी झाल्याने भाषा आत्मसात करण्यात अडचण येऊन अध्ययन अक्षमता येते आणि चिंता वाढते. श्रवणदोषावर उपचार न केल्यास एकटेपणा, नैराश्य आणि आकलनक्षमता कमी होऊ शकते. तथापि, एक सुखावह गोष्ट म्हणजे कर्कश्य आवाजाने होणारा श्रवणदोष हा सुरक्षित ऐकण्याच्या सवयी लावून टाळता येऊ शकतो यावर त्यांनी भर दिला.   सुरक्षित श्रवण उपकरणे आणि प्रणालींसाठी जागतिक आयटीयू मानक वैयक्तिक श्रवण उपकरणांमध्ये वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यासाठी एक चौकट प्रदान करते असेही त्यांनी नमूद केले.

जगातील 34 दशलक्ष मुलांसह 5% पेक्षा जास्त लोकसंख्येला श्रवणदोष मुक्त करणे आवश्यक असून त्यासाठी योग्य नियमन आणि भरपूर प्रमाणात जागरूकता करणे आवश्यक असल्याचे दूरसंचार विभागाचे उपमहासंचालक आणि प्रवक्ते हेमेंद्र के शर्मा यांनी  सांगितले.

For regular updates, Follow DoT Handles

X - https://x.com/DoT_India

Insta- https://www.instagram.com/department_of_telecom?igsh=MXUxbHFjd3llZTU0YQ==

Fb - https://www.facebook.com/DoTIndia

YT- https://www.youtube.com/@departmentoftelecom]

*****


S.Kakade/R.Agashe/V.Joshi/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2066259) Visitor Counter : 47


Read this release in: English , Urdu , Hindi