ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
‘जागतिक मानक दिन 2024’ निमित्त बीएसआयच्या वतीने पनवेलमध्ये ‘ट्रेझर हंट’ स्पर्धेचे आयोजन
Posted On:
17 OCT 2024 5:59PM by PIB Mumbai
मुंबई, 17 ऑक्टोबर 2024
जागतिक मानक दिन 2024 निमित्त, बीएसआय म्हणजेच भारतीय मानक ब्युरोच्या मुंबई शाखा कार्यालय- दोन च्यावतीने नवीन पनवेल येथील पिल्लई अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सहकार्याने ‘ट्रेझर हंट’ स्पर्धेचे आयोजन केले होते.बीआयएस आणि प्रयोगशाळेतील उपकरणांमध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध मानकांबद्दल जागरूकता निर्माण करणे,हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.

या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला. एका प्रश्नमंजुषेच्या माध्यमातून विद्यार्थी निवडण्यात आले होते .निवडलेल्या उमेदवारांना विविध मानकांवर आधारित अनेक संकेत देण्यात आले. त्यांच्या मदतीने स्पर्धकांनी संपूर्ण महाविद्यालयाच्या परिसरात दडविण्यात आलेल्या खजिन्याचा शोध घेतला.
बीएसआयच्या मुंबई शाखेचे सहसंचालक टी. अर्जुन, पिल्लई अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एम. जोशी, तसेच डॉ. अरुण पिल्लई आणि डॉ. सुरभी या कार्यक्रमाला उपस्थित होते.‘ट्रेझर हंट’ स्पर्धेमध्ये संयुक्तपणे उत्तम कामगिरी करणाऱ्या सर्वोत्कृष्ट चार विजेत्या संघांना निवडण्यात आले.त्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. बीआयएस आणि पिल्लई अभियांत्रिकी महाविद्यालयाने आयोजित केलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये केवळ जागरूकता वाढली नाही तर विविध क्षेत्रातील मानकांचे महत्त्वही अधोरेखित केले.

S.Kane/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2065869)
Visitor Counter : 51