वस्त्रोद्योग मंत्रालय
वस्त्रोद्योग मंत्रालयाने 3,75,000 रुपये महसूल प्राप्ती करण्याबरोबरच “विशेष मोहीम 4.0” अंतर्गत 15,606 चौरस फूट जागा मोकळी करून 19,882 फायलींचे पुनरावलोकन केले तर 2,462 फायली काढून टाकल्या
Posted On:
16 OCT 2024 8:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर 2024
वस्त्रोद्योग मंत्रालयाने त्याच्या संस्थांसोबत 2 ऑक्टोबर पासून 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत "विशेष मोहीम 4.0" सुरू केली आहे. स्वच्छता अंगी बाणवण्याबरोबरच प्रलंबितता कमी करणे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.
"विशेष मोहीम 4.0" मध्ये दोन टप्प्यांचा समावेश आहे. तयारीचा टप्पा 16 सप्टेंबर 2024 ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीत पार पडला, मंत्रालयाने स्वच्छता मोहिमेच्या ठिकाणांची निवड, जागा व्यवस्थापन आणि कार्यालय सुशोभीकरणासाठी नियोजन, भंगार आणि अनावश्यक वस्तू तसेच व्हीआयपी संदर्भ ओळखणे, सार्वजनिक तक्रारी आणि निपटाऱ्यासाठी अपील यासह विशिष्ट लक्ष्ये निश्चित केली होती. नको असलेल्या फायली काढून टाकण्याच्या उद्देशाने फायली पुनरावलोकनासाठी वेगळ्या काढण्यात आल्या. तसेच अप्रचलित इलेक्ट्रॉनिक वस्तू, तुटलेले आणि मोडकळीस आलेले फर्निचर इत्यादींच्या रूपात भंगार साहित्य विल्हेवाटीसाठी बाजूला काढण्यात आले.
आजपर्यंत मंत्रालयाच्या कामगिरीत 19,882 फायलींचे पुनरावलोकन केले गेले आहे, नको असलेल्या 2,462 फायली काढून टाकण्यात आल्या. एकूण 15,606 चौरस फूट जागा मोकळी करण्यात आली आणि 3,75,000 रुपयांपेक्षा अधिक महसूल प्राप्ती झाली.
S.Patil/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2065592)