संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नौदलाच्या कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण पुरवण्यासाठी भारतीय नौदलाचा बजाज अलियान्झ लाइफ इन्शुरन्ससोबत सामंजस्य करार

Posted On: 10 OCT 2024 7:34PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 ऑक्‍टोबर 2024

 

कर्मचाऱ्यांच्या मनुष्यबळ व्यवस्थापनामध्ये उत्कृष्टता, नाविन्य, अनुकूलता आणण्यासाठीआणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी भारतीय नौदल वचनबद्ध आहे आणि हे लक्ष्य साध्य करण्यासाठी सर्वसमावेशकतेची संस्कृती वाढवणे आणि विविध कल्याणकारी उपायांची अंमलबजावणी करून आपुलकीची भावना जागृत करणे हे प्रमुख उद्दिष्ट्यांपैकी एक आहे.

नौदल कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची काळजी वाटणाऱ्या गोष्टींपैकी एक  म्हणजे सेवेत कार्यरत असलेल्या व्यक्तीचा अकाली मृत्यू झाल्यास  कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी.  शोकग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी जीवन विमा असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

भारतीय नौदलाने त्यानुसार बजाज अलियान्झ लाइफ इन्शुरन्स कंपनीसोबत विविध पर्यायांसह परवडणाऱ्या हप्त्यांसह मुदत विमाच्या विविध उत्पादनांचा लाभ  नौदल नागरिकांना देण्यासाठी हा सामंजस्य करार केला आहे. नौदल नागरीकांना ऐच्छिक आधारावर विमा मिळू शकतो. यात विमा पॉलिसी अंतर्गत समाविष्ट असलेल्या विद्यमान व्यक्तीचा मृत्यू किंवा इतर कोणत्याही घटनेच्या बाबतीत त्वरित आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात मदत करेल.

‘नौदल कर्मचारी वर्ष’ याचा एक भाग म्हणून कार्मिक प्रमुख व्हाईस ऍडमिरल संजय भल्ला यांनी बजाज अलियान्झ लाइफ इन्शुरन्स कंपनीने प्रदान केलेल्या जीवन विमा सुरक्षेचे  कौतुक केले, जे भारतीय नौदल कर्मचाऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी खास तयार केले आहेत. नौदल कर्मचारी  आणि त्यांच्या कुटुंबांच्या कल्याणासाठी भारतीय नौदलाच्या  वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला.

 

* * *

S.Kane/G.Deoda/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2063948) Visitor Counter : 60


Read this release in: English , Urdu , Hindi