रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
नागपूर येथील अद्ययावत होणारा विमानतळ विदर्भासाठी विकासाचे इंजिन बनेल: नव्या टर्मिनलच्या भूमिपूजन समारंभात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
Posted On:
09 OCT 2024 6:00PM by PIB Mumbai
नागपूर, 9 ऑक्टोबर 2024
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज, बुधवारी, नागपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या टर्मिनल उभारणी कार्याचा भूमिपूजन समारंभ करण्यात आला.सुमारे 7,000 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या या टर्मिनलचा कोनशीला समारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आला.

या कार्यक्रमात बोलताना, हे नवे टर्मिनल केवळ विदर्भासाठीच नव्हे तर मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि आंध्रप्रदेश यांसारख्या शेजारी राज्यांसाठी देखील विकासाच्या इंजिनाचे कार्य करेल यावर गडकरी यांनी भर दिला.अनेक आंतरराष्ट्रीय विमानांसाठी आगमन-गंतव्य स्थान म्हणून कार्य करण्यासोबतच हे टर्मिनल, 900,000 टन क्षमतेच्या कार्गोची हाताळणी करण्याच्या क्षमतेसह इतर अनेक अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त असेल.
ते म्हणाले, “या सर्व घटकांमुळे नागपूर विमानतळ लवकरच मध्य भारतातील सर्वांसाठी गेम चेंजर म्हणून सिध्द होईल.”

गेल्या दशकभरात, नागपूरचा लक्षणीय विकास झाला आहे. संत्र्यांची राजधानी म्हणून सुप्रसिध्द असलेले हे शहर आता वाघांसाठी देखील प्रसिध्द झाले असून अनेक सुप्रसिध्द व्यक्तींसह देशभरातून अनेकानेक पर्यटक येथे येऊ लागले आहेत. नुकतेच येथे झालेले उल्लेखनीय असे चार स्तरीय पुलांचे उद्घाटन येथील पायाभूत सुविधा क्षेत्रातील अनोखी कामगिरी ठरली आहे. अखंड पाणीपुरवठ्यासारख्या मुलभूत सुविधांसह या शहरात एम्स, आयआयएम तसेच सिंबायोसिस सारख्या प्रमुख शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत. नजीकच्या काळात झालेल्या मिहानच्या विस्तारामुळे लक्षणीय प्रमाणातील रोजगार निर्मिती देखील झाली आहे.
अद्ययावत विमानतळामुळे सध्या सुरु असलेल्या विकासविषयक कार्यांमध्ये वाढ होईल आणि मध्य भारतात नव्या संधी निर्माण होतील. आगामी काळात नागपूर विमानतळावरील विमाने विदर्भातील शेतकऱ्यांनी तयार केलेल्या बायो-एव्हिएशन इंधनावर चालतील अशी आशा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.
J62M.jpeg)
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्थानिक आमदार आणि इतर सरकारी अधिकारी देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
* * *
PIB Nagpur | N.Chitale/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2063586)
Visitor Counter : 40