आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी एम्स (AIIMS) नागपूर च्या 6 व्या स्थापना दिवस समारंभाला केले संबोधित

Posted On: 08 OCT 2024 10:22PM by PIB Mumbai

नागपूर, 8 ऑक्टोबर 2024

एम्स (AIIMS) नागपूरने आरोग्यसेवा, वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि कम्युनिटी  सेवा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीचा ठसा उमटवत आपला 6 वा स्थापना दिवस साजरा केला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्यासह इतर प्रतिष्ठित मान्यवर यावेळी उपस्थित होते.

प्रतापराव जाधव यांनी आपल्या भाषणात सांगितले की,आपल्या जीवनात आरोग्य सेवा महत्वाची भूमिका बजावते. जेव्हा एखाद्या सामान्य माणसाला उत्तम आणि माफक दरात  उपचार मिळतात, तेव्हा त्याचा सरकार आणि व्यवस्थेवरचा विश्वास अनेक पटीने वाढतो. उत्तम आरोग्य सेवा ही केवळ आजाराच्या उपचारांपुरती मर्यादित नाही, तर ती सामाजिक न्याय देखील सुनिश्चित करते असे ते म्हणाले.

आयुष्यमान योजना आणि जनऔषधी केंद्रांच्या माध्यमातून देशातील सामान्य नागरिकांची  कोट्यवधी रुपयांची  बचत झाली  आहे. याशिवाय, योग आणि आयुषला प्रोत्साहन दिल्यामुळे आरोग्य सेवांवर होणारा खर्च देखील कमी झाला आहे. आयुषमधून आरोग्याच्या  आमच्या  संकल्पना संपूर्ण जगभरातील देशांना आपल्या पारंपरिक औषधोपचार पद्धतीकडे आकर्षित करत आहे. योग आणि आयुषच्या प्रचारामुळे भारतात हेल्थ टुरिझम (आरोग्य पर्यटन) वाढत आहे.

जाधव यांनी डॉक्टरांच्या  सुरक्षेबद्दल सांगताना म्हटले की, सरकार डॉक्टरांच्या  सुरक्षेसाठी पूर्णपणे कटिबद्ध असून त्याला सरकारचे प्राधान्य आहे.  

एमबीबीएस विद्यार्थ्यांना शैक्षणिक उत्कृष्टतेबद्दल पदके यावेळी प्रदान करण्यात आली.  

उल्लेखनीय कामगिरी आणि सेवांचा विस्तार

एम्स नागपूरची 2018 मध्ये स्थापना झाल्यापासून, एक प्रमुख तृतीयक आरोग्य केंद्र म्हणून त्याचा झपाट्याने विकास झाला आहे. 2023 मध्ये, संस्थेमध्ये 557,000 पेक्षा जास्त बाह्यरुग्ण (ओपीडी) नोंदणी झाली. तर सप्टेंबर 2024 पर्यंत, दररोज 4,404 रुग्णांच्या नोंदीसह ही संख्या 520,077 वर पोहोचली आहे.

41 कार्यरत विभागांसह, वैद्यकीय गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि पेडियाट्रिक इम्युनोलॉजी यासह नवीन सुपर-स्पेशालिटी ओपीडी च्या माध्यमातून विविध वैद्यकीय सेवा श्रेणींचा विस्तार करण्यात आला आहे.  

एम्स (AIIMS) नागपूरमध्ये 76 विशेष दक्षता विभागातील (ICU) खाटांसह 820 कार्यरत खाटा असून, दररोज सरासरी 4000-4500 ओपीडी रुग्ण संख्येसह, 30 सप्टेंबरपर्यंत एकूण 17,52,641 ओपीडी रुग्णांची नोंद झाली.  

बोन मॅरो ट्रान्सप्लांट युनिट, पीईटी-सीटी आणि अत्याधुनिक एंडोस्कोपी युनिटच्या अलीकडे झालेल्या उद्घाटनासह, अत्याधुनिक आरोग्य सेवेप्रति असलेली एम्स (AIIMS) नागपूरची वचनबद्धता अधोरेखित झाली आहे.

संस्थेने सर्वसमावेशक ट्रान्सजेंडर आरोग्य सेवा, यासह तंबाखू मुक्ती जनजागृती केंद्र आणि आणि मल्टीडिसिप्लिनरी (बहुविद्याशाखीय) सिकल सेल केंद्र देखील सुरू केले आहे.

डिसेंबर 2023 मध्ये "ई-वैद्य" ऑनलाइन सल्ला-आधारित अपॉइंटमेंट प्रणाली सुरु करणारी एम्स (AIIMS) नागपूर, ही पहिली संस्था होती. या प्रणालीवर मे 2024 पर्यंत 3,290 पेक्षा जास्त अपॉइंटमेंट नोंदवल्या गेल्या.

एम्स (AIIMS) नागपूरने PATH या स्वयंसेवी संस्थेच्या सहयोगाने फेब्रुवारी 2023 मध्ये मेळघाटात टेली SNCU हा उपक्रम सुरू केला. परिणामी रेफरल्समध्ये (नवे रुग्ण) 50% घट झाली आणि मृत्यूदर 6.4% वरून कमी होऊन 4.9% वर आला. या तंत्रज्ञान-संचालित कार्यक्रमामुळे सेप्सिसची प्रकरणे लक्षणीयरीत्या कमी झाली आणि दुर्गम आदिवासी भागात आरोग्यसेवा पुरवठ्यात परिवर्तन झाले. इतर टेलीमेडिसिन उपक्रमांमध्ये टेली-मानस आणि ई-संजीवनी या उपक्रमांचा समावेश आहे.

गुणवत्ता आणि मान्यता यासाठी वचनबद्धता

एम्स (AIIMS) नागपूरची दर्जेदार आरोग्य सेवेप्रति असलेली बांधिलकी संस्थेने अलीकडे दिलेल्या मान्यतांमधून दिसून येते.

मे 2023 मध्ये NABH प्रवेश पातळीवरील मान्यता मिळवणारे ते पहिले एम्स (AIIMS) ठरले. आणि फेब्रुवारी 2024 मध्ये संस्थेची नीतिमत्ता समिती ‘NABH अधिस्वीकृती प्राप्त’ ठरली.  

शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातील कामगिरी

शैक्षणिक क्षेत्रात, एम्स (AIIMS) नागपूर दरवर्षी एमबीबीएस च्या 125 विद्यार्थ्यांना प्रवेश देते आणि 22 स्पेशालिटी  पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या 143 जागा उपलब्ध करते.

 

 

N.Chitale/R.Agashe/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2063331) Visitor Counter : 65


Read this release in: English