शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली एनसीईआरटी आणि ॲमेझॉन यांच्यात अनुबंध पत्रावर स्वाक्षरी

Posted On: 07 OCT 2024 9:32PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 ऑक्‍टोबर 2024

 

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली आज राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT) आणि ॲमेझॉन सेलर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात अनुबंध पत्रावर (LoE) स्वाक्षरी झाली. हा अशा प्रकारचा  पहिलाच करार आहे, जो प्रमुख ई-कॉमर्स व्यासपीठावर छापील किमतीत मूळ एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांची उपलब्धता सुनिश्चित करेल.

आजचा उपक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अनुसार  शिक्षणाला सर्वसमावेशक, सुलभ आणि परवडण्याजोगा बनवण्याच्या दृष्टीकोनाला बळ देईल, असे प्रधान यांनी उपस्थितांना  संबोधित करताना सांगितले.  शिवाय, ही पुस्तके देशभरात जवळपास 20,000 पिन कोडवर उपलब्ध करून दिली जातील अशी घोषणा त्यांनी केली.  ही पुस्तके कमाल किरकोळ किमतीत (एमआरपी) मिळायला हवीत, यावर त्यांनी भर दिला.

धर्मेंद्र प्रधान यांनी एनसीईआरटीच्या ॲमेझॉन सोबतच्या भागीदारीचे कौतुक केले. ही भागीदारी म्हणजे  जीवन सुलभता आणि सर्वांपर्यंत शिक्षण पोहचवण्याच्या दिशेने एक पाऊल असल्याचे ते म्हणाले. एनसीईआरटी  पुस्तकांचे प्रकाशन तिपटीने वाढवेल आणि पुढील शैक्षणिक सत्रासाठी (2025-26) सुमारे 15 कोटी पुस्तके प्रकाशित करेल, असेही ते म्हणाले.

सर्व इयत्तांची एनसीईआरटी पाठ्यपुस्तके आज सुरु करण्यात आलेल्या ॲमेझॉनच्या एनसीईआरटी स्टोअरफ्रंट (http://amazon.in/ncert) वर उपलब्ध करून दिली जातील.  

 

* * *

S.Kane/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2062996) Visitor Counter : 91


Read this release in: English , Urdu , Hindi , Odia , Tamil