रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी महाराष्ट्रात नाशिक येथे रेल्वेच्या प्रमुख लोको इन्स्पेक्टर्सशी साधला संवाद

Posted On: 04 OCT 2024 8:39PM by PIB Mumbai

 

केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (IRIEEN), नाशिक येथे प्रशिक्षण घेत असलेल्या प्रमुख लोको इन्स्पेक्टर्स (सीएलआय) बरोबर संवाद साधला. आपल्या भेटीदरम्यान, यांनी लोकोमोटिव्ह ऑपरेशन्सचे आधुनिकीकरण आणि भारतीय रेल्वेतील सुरक्षा उपायांमधील वाढ याबाबतच्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली.

केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी सीएलआय बरोबर त्यांच्या प्रशिक्षणाचा अनुभव, विशेषत: कवच, या स्वदेशी स्वयंचलित ट्रेन संरक्षण (ATP) प्रणाली वापरताना आलेला अनुभव, यावर चर्चा केली. सीएलआय नी कवच प्रणाली, रेल्वे गाडीचे परिचालन  करताना वेग राखण्यात तसेच सुरक्षितता आणि वक्तशीरपणा या दोन्हींमध्ये सुधारणा करण्यात त्यांचा आत्मविश्वास कसा वाढवते याबद्दलचा त्यांचा अनुभव सांगितला. आधुनिक ब्रेकिंग सिस्टीम, लोकोमोटिव्हमधील नवीन तंत्रज्ञान आणि प्रभावी क्रू (गाडीतील कर्मचारी) व्यवस्थापन पद्धती यावरही त्यांनी चर्चा केली.

केंद्रीय मंत्र्यांनी, क्रूसाठी  100% वातानुकूलित रनिंग रूम आणि लोको इन्स्पेक्टरसाठी सुधारित सुविधा, यासह कामाच्या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी रेल्वेने केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली. सीएलआयशी संवाद साधतानावैष्णव यांनी सुरक्षा प्रोटोकॉलचे काटेकोर पालन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले आणि प्रशिक्षण मॉड्यूल्सचा पुनरुच्चार केला ज्यामध्ये सिम्युलेटर, फील्ड स्टाफच्या सूचना इत्यादींचा समावेश आहे.

भोपाळ विभागाचे सीएलआय एस के राठी यांनी आपला अनुभव सांगितला. ते म्हणाले की, इंटरलॉकिंग, हे स्टेशन मास्टरला सुरक्षित ऑपरेशनसाठी मदत करते, ट्रॅकमन आणि कवचसाठी PSC स्लीपर्स ट्रॅक हे एक क्रांतिकारी पाऊल आहे, कारण ते सुरक्षित ट्रेन ऑपरेशनसाठी लोको पायलटला मदत करते.

कवच SPAD (धोकादायक पद्धतीने सिग्नल ओलांडणे) घटनांना रोखण्यात मदत करत आहे आणि लेव्हल क्रॉसिंग गेट्सवर सुरक्षितता सुनिश्चित करते, एका सीएलआय ने आपला अनुभव सांगितला. सीएलआय नी नव्याने उपलब्ध झालेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करावा असे आवाहन केंद्रीय मंत्र्यांनी  केले आणि भारतीय रेल्वेचा उत्तम दर्जा कायम राखण्यासाठी सातत्त्याने शिकणे, समर्पण आणि वचनबद्धतेच्या महत्त्वावर भर दिला.

नाशिक दौऱ्याचा भाग म्हणून, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शिर्डी येथील  साईबाबा मंदिराला भेट दिली आणि भारतीय रेल्वे आणि त्याच्या समर्पित कर्मचाऱ्यांची निरंतर प्रगती आणि सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली.

***

N.Chitale/R.Agashe/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2062261) Visitor Counter : 128


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi