संरक्षण मंत्रालय
भारतीय हवाई दलाने साजरा केला स्वच्छता दिवस - स्वच्छता आणि शाश्वततेच्या वचनबद्धतेची केली पुष्टी
प्रविष्टि तिथि:
02 OCT 2024 3:58PM by PIB Mumbai
भारतीय हवाई दलाने (आयएएफ) आज देशव्यापी "स्वच्छ भारत अभियान" अंतर्गत स्वच्छता दिवस साजरा केला. पर्यावरणीय शाश्वतता राखण्याच्या दिशेने आणखी स्वच्छता हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हवाई दलाचे विविध विभाग आणि हवाई तळांवर स्वच्छता आणि पर्यावरण जागरूकता वाढवण्यासाठी हवाई दलाच्या समर्पणाच्या भूमिकेचा पुनरूच्चार करण्यात आला.
हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल ए पी सिंग यांनी हवाई दलाचे वरिष्ठ अधिकारी आणि नागरी कर्मचाऱ्यांसमवेत हवाई मुख्यालय वायू भवन येथे स्वच्छता मोहिमेत भाग घेऊन या उपक्रमाचे नेतृत्व केले. स्वच्छता मिशन म्हणून केवळ उपक्रम पार पाडला गेला नाही तर, महात्मा गांधींच्या स्वप्नातील स्वच्छ आणि स्वावलंबी भारताचा विचार करून सर्वांनी स्वच्छतेविषयी एक राष्ट्रीय जबाबदारी म्हणून योगदान दिले.
***
S.Patil/S.Bedekar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2061258)
आगंतुक पटल : 61