सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय प्रतिदर्श सर्वेक्षण कार्यालय -एनएसएसओ नागपूरद्वारे स्वच्छता ही सेवा पंधरवाड़ा अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन

Posted On: 01 OCT 2024 8:37PM by PIB Mumbai

नागपूर, 1 ऑक्टोबर 2024

 

केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या अधीन  सेमिनरी हिल्स, नागपूर स्थित राष्ट्रीय प्रतिदर्श सर्वेक्षण कार्यालय (क्षेत्र संकार्य प्रभाग), विभागीय कार्यालय आणि प्रादेशिक कार्यालयाद्वारे  स्वच्छता ही सेवा पंधरवाड़ा आयोजित करण्यात आला होता. या अंतर्गत 14 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2024 या कालावधीत स्वच्छता ही सेवा पंधरवाड़ा साजरा करण्यात आला, त्यादरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 

अभियानाचा प्रारंभ प्रादेशिक कार्यालयात.श्रीनिवास उप्पला, उपमहासंचालक, विभागीय कार्यालय नागपूर यांच्या उपस्थितीत विभागीय व प्रादेशिक कार्यालय नागपूर येथील सर्व अधिकारी/कर्मचाऱ्यांनी स्वच्छता शपथ घेऊन करण्यात आला. “एक पेड माँ के नाम” या  उपक्रमा  अंतर्गत कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी ठिकठिकाणी वृक्षारोपण केले. तसेच उपमहासंचालक व इतर अधिकाऱ्यांनी एनएसएसओ भवन (वसतिगृह) परिसरात वृक्षारोपण केले. स्वच्छता जागृती मोहिमेंतर्गत, नूतन महाविद्यालय, उमरेडच्या विद्यार्थ्यांना सांख्यिकी विषयात  त्यांचे भविष्य घडविण्यासाठी एनएसएसओ अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले आणि विद्यार्थ्यांनी स्वच्छता प्रतिज्ञा घेतली तसेच एनएसएसओ (एफओडी), नागपूरच्या अधिकाऱ्यांनी महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केली होती. कार्यालयात स्वच्छतेवर आधारित निबंध स्पर्धा, काव्य लेखन, घोषवाक्य आणि वेस्ट टू आर्ट इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते ज्यात अधिकारी/कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

   

श्रीनिवास उप्पला, उपमहासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली कार्यालयातील सर्व अधिकारी/कर्मचारी नगरधन, तालुका रामटेक, जिल्हा नागपूर येथे रवाना झाले. सर्वप्रथम, नगरधन गावाचे सरपंच/उपसरपंच आणि ग्राम पंचायतीच्या इतर अधिकाऱ्यांना स्वच्छता ही सेवा पखवाडा आणि सांख्यिकी जनजागृतीची ओळख करून देण्यात आली. त्यानंतर एनएसएसओ कार्यालयातर्फे ग्रामपंचायत, नगरधन यांना घड्याळ व ज्यूटची पिशवी भेट म्हणून देण्यात आली.एनएसएसओ (एफओडी), नागपूरच्या अधिकाऱ्यांनी गावातील सामान्य जनतेमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी पथनाट्य सादर केले. यासोबतच ग्रामपंचायत इमारतीच्या परिसरात स्वच्छता व वृक्षारोपण करण्यात आले. स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी गावात रॅलीही काढण्यात आली.

  

यासोबतच नगरधन गावातील नंदीवर्धन कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली आणि  एनएसएसओ नागपूरच्या अधिकाऱ्यांनी शाळा महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण केले. शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयात सॅनिटायझर आणि हँडवॉशचे वाटप करण्यात आले.

एनएसएसओ कार्यालयाद्वारे कार्यालय परिसरालगत  3 किमी स्वच्छता रॅलीही  काढण्यात आली आणि स्वच्छतेच्या संदर्भात घोषणा देण्यात आल्या.या अभियानाच्या समारोपप्रसंगी  कार्यालयाने आयोजित केलेल्या सर्व स्पर्धांमधील विजेत्या कर्मचाऱ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

 

* * *

PIB Nagpur | S.Rai/D.Wankhede/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2060904) Visitor Counter : 64


Read this release in: English