ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मुंबईतील पवई तलाव येथे आयोजित स्वच्छता मोहिम आणि ‘एक पेड माँ के नाम’ मोहिमेत एनटीपीसी पश्चिम क्षेत्र-I मुख्यालयासह मुंबई पत्र सूचना कार्यालयाचा देखील सहभाग


Posted On: 01 OCT 2024 4:20PM by PIB Mumbai

मुंबई, 1 ऑक्‍टोबर 2024

 

केंद्र सरकारने सुरू केलेल्या “स्वच्छता ही सेवा 2024” मोहिमेचा भाग म्हणून आज मुंबईतील पवई तलाव येथे आयोजित स्वच्छता मोहिमेत एनटीपीसी पश्चिम क्षेत्र-I मुख्यालयाच्या चमूबरोबर पत्र सूचना कार्यालय (पीआयबी), मुंबईचे अधिकारी देखील सहभागी  झाले होते. स्वच्छतेबाबत जनजागृती करणे आणि मुंबईसारख्या महानगरांना स्वच्छ ठेवण्याच्या प्रयत्नांना चालना देणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.

 

स्वच्छता मोहिमेची सुरुवात स्वच्छता प्रतिज्ञा घेऊन करण्यात आली आणि त्यानंतर एनटीपीसी आणि पत्र सूचना कार्यालयाच्या (पीआयबी) सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन “एक पेड माँ के नाम” मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण केले. या वृक्षारोपण मोहिमेचा उद्देश केवळ पर्यावरण रक्षणात योगदान देणे हा नसून आपल्या जीवनासाठी झाडे व वनस्पतींचे संवर्धन किती महत्त्वाचे आहे हा संदेश समाजाला देणे हा देखील आहे.

वृक्षारोपणानंतर पवई तलावाच्या आजूबाजूला राहणारे रहिवासी आणि सकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते, जे महेंद्रकुमार श्रीवास यांच्या चमूने सादर केले. या नाटकाच्या माध्यमातून लोकांना स्वच्छतेचे महत्त्व आणि ती कायम राखण्याच्या उपायांची माहिती देण्यात आली.

यावेळी बोलताना प्रकाश म्हणाले की पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी आणि आपली पृथ्वी निरोगी ठेवण्यात हातभार लावतील अशी पावले उचलण्यासाठी एनटीपीसी वचनबद्ध आहे. या मोहिमेत महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल त्यांनी पीआयबीच्या अधिका-यांचे   विशेष आभार मानले.

पर्यावरणाचे रक्षण आणि स्वच्छता राखणे ही सामूहिक जबाबदारी आहे यावर भर देतएनटीपीसी पश्चिम क्षेत्र-I स्वच्छता अभियानात सक्रियपणे सहभागी होत आहे.  स्वच्छता अभियान आणि देशभरात हाती घेण्यात आलेल्या स्वच्छतेच्या उपक्रमांना पत्र सूचना कार्यालय व्यापक प्रसिद्धी  देत आहे जेणेकरून ते प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचेल आणि ही लोक  चळवळ अधिक यशस्वी होईल.

कार्यक्रमाला एनटीपीसी पश्चिम क्षेत्र-I आणि दक्षिण क्षेत्र चे  प्रादेशिक कार्यकारी संचालक प्रेम प्रकाश, न्यूक्लियर इंजीनियरिंगचे कार्यकारी संचालक प्रसेनजीत पाल, महाव्यवस्थापक (ऑपरेशनल सर्व्हिसेस) सत्य सुब्रह्मण्य श्रीनिवास, महाव्यवस्थापक (इंजीनियरिंग न्यूक्लियर सेल) अरनदा प्रसाद सामल, अतिरिक्त महाव्यवस्थापक (प्रादेशिक विभाग प्रमुख, मनुष्यबळ) वंदना चतुर्वेदी आणि पीआयबीच्या माध्यम आणि संपर्क अधिकारी श्रीयंका चॅटर्जी उपस्थित होते.

स्वच्छता ही सेवा 2024 ची संकल्पना, 'स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता' अशी असून याचा उद्देश 'संपूर्ण समाज दृष्टिकोन' अंतर्गत देशभरात स्वच्छतेसाठी सामूहिक कृती आणि नागरिकांच्या सहभागाची भावना पुन्हा जागृत करणे हा आहे. या मोहिमेत राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती, अनेक मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, खासदार/आमदार आणि राज्यपालांसह राज्य सरकारे, स्थानिक प्राधिकरणे आणि सामुदायिक गट यांचा सक्रिय सहभाग दिसून आला. एक पेड माँ के नाम या उपक्रमांतर्गत देशभरात 55 लाखांहून अधिक झाडे लावण्यात आली आहेत. 17 सप्टेंबर रोजी सुरू झालेल्या स्वच्छता ही सेवा (SHS) 2024 मोहिमेचा 2 ऑक्टोबर 2024 रोजी 155 व्या  गांधी जयंती दिनी समारोप होईल.

 

 

* * *

PIB Mumbai | N.Chitale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2060696) Visitor Counter : 46


Read this release in: English