ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एनटीपीसी पश्चिम विभाग-I मुख्यालयाने टाटा मेमोरियल सेंटरच्या सहयोगाने आयोजित केला कर्करोग जनजागृती आणि निदान उपक्रम

Posted On: 27 SEP 2024 8:57PM by PIB Mumbai

मुंबई, 27 सप्‍टेंबर 2024

 

राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ (एनटीपीसी) पश्चिम विभाग-I मुख्यालयाने, आपल्या कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) उपक्रमांचा एक भाग म्हणून, मुंबईच्या मीरा भाईंदर भागात कर्करोग जनजागृती आणि निदान चाचणी कार्यक्रम आयोजित करून सार्वजनिक आरोग्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल उचलले आहे.

टाटा मेमोरियल सेंटरच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उद्दिष्ट, आघाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमधील कर्करोग आणि इतर असंसर्गजन्य आजारांच्या (एनसीडी) गंभीर समस्येचे निराकरण करणे, हे आहे.

समाजाची सेवा आणि रक्षण करण्यात पोलीस कर्मचारी बजावत असलेली महत्त्वाची भूमिका ओळखून, एनटीपीसीने आयोजित केलेला हा उपक्रम समर्पित सेवा देणाऱ्या या व्यक्तींचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी जागरूकता वाढवण्यावर आणि चाचणी आयोजित करण्यावर लक्ष केंद्रित करतो. हा कार्यक्रम, सार्वजनिक आरोग्याचा पुरस्कार आणि कर्करोग प्रतिबंधक उपायांना पाठबळ  देण्याप्रति एनटीपीसीची असलेली वचनबद्धता अधोरेखित करतो.

चाचणी शिबिरात 500हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. या उपक्रमात कर्करोग प्रतिबंध आणि एनसीडी व्यवस्थापनावरील महत्वाची माहितीही प्रसारित केली.

   

हा उपक्रम जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या पूर्वसंध्येला सुरू करण्यात आला असून, आरोग्याबाबत जागरुकता वाढवण्यासाठी आणि कर्करोगाविरोधातील लढ्यात, या आजाराचे लवकर निदान करण्यासाठी समर्पित असलेल्या टाटा मेमोरियल रुग्णालयाच्या  सहयोगाने  राबवला जात आहे.

मीरा भाईंदर विभागात गेले चार महिने कर्करोग निदान चाचणी आणि जनजागृती शिबिर सुरू असून, आतापर्यंत सुमारे 5,000 पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याचा लाभ घेतला आहे.

 

* * *

PIB Mumbai | S.Kakade/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2059695) Visitor Counter : 37


Read this release in: English