सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिसएबिलिटीज् (दिव्यांगजन) साजरा करत आहे ‘कर्णबधीर लोकांसाठी आंतरराष्ट्रीय सप्ताह 2024’
Posted On:
26 SEP 2024 10:24PM by PIB Mumbai
मुंबई, 26 सप्टेंबर 2024
भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या अखत्यारितील दिव्यांगजन सक्षमीकरण विभागांतर्गत येणारी अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिसएबिलिटीज् (दिव्यांगजन) {एवायजेएनआयएसएचडी (डी)} वांद्रे (पश्चिम), मुंबई ‘कर्णबधीर लोकांसाठी आंतरराष्ट्रीय सप्ताह 2024’ साजरा करत आहे. या समुदायाचे मानवाधिकार आणि कर्णबधिरतेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा सप्ताह साजरा करतात. यंदा या सप्ताहाची संकल्पना ‘साईन अप फॉर साईन लँग्वेज राइट्स’ अर्थात‘सांकेतिक भाषा हक्कांसाठी साईन अप करा’ अशी आहे.

समावेशकता आणि सुलभतेच्या प्रसारावर भर देत शिक्षण विभागाने या सप्ताहाच्या साजरीकरणाला सुरुवात केली आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून, जीवनात सर्वत्र वावरताना कर्णबधीर महिलांमध्ये सक्षम, सुरक्षित आणि पाठबळ असल्याची भावना निर्माण व्हावी यासाठी सुरक्षेच्या उपाययोजना आणि उपकरणे निर्माण करण्यावर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे.
याचा भाग म्हणून {एवायजेएनआयएसएचडी (डी)}ने सुरक्षित कन्या – सशक्त कन्या “प्रौढ कर्णबधिर मुलींची सुरक्षा” या विषयावर एव्हररेडीच्या सहयोगाने 26 सप्टेंबर 2024 रोजी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. एव्हररेडी कंपनीने ‘एव्हररेडी सायरन – ए टॉर्च’ या सुरक्षा उपकरणाचे सुमारे 80 विद्यार्थिनींना वाटप केले. विविध विशेष शाळांमधील, आपापल्या सोबतीच्या व्यक्तीसह उपस्थित 80 बधीर विद्यार्थिनींना सुरक्षेच्या उपाययोजनांचे प्रशिक्षण देण्यात आले.

{एवायजेएनआयएसएचडी (डी)} आणि एव्हररेडी कंपनीचा या प्रयत्नांमार्फत समाजाच्या सर्व क्षेत्रांत लिंगभेद दूर करून महिलांना सक्षम करण्याचा उद्देश आहे.
‘कर्णबधीर लोकांसाठी आंतरराष्ट्रीय सप्ताह 2024’ बाबत अधिक माहितीसाठी कृपया डॉ. गायत्री अहुजा यांच्याशी 9833640020 या क्रमांकावर संपर्क साधावा.
* * *
PIB Mumbai | N.Chitale/R.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2059280)
Visitor Counter : 34