वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

परराष्ट्र व्यापार महासंचालनालय - डीजीएफटी नागपूर कार्यालयाद्वारे स्वच्छता ही सेवा मोहीम

Posted On: 26 SEP 2024 6:28PM by PIB Mumbai

नागपूर 26 सप्टेंबर 2024

 

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत नागपूरच्या नवीन सचिवालय स्थित परराष्ट्र  व्यापार महासंचालनालय - डीजीएफटी  नागपूर कार्यालयाद्वारे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2024 या कालावधीत स्वच्छता ही सेवा या अभियाना अंतर्गत सर्वसमावेशक स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेचा उद्देश स्वच्छतेबाबत जनजागृती करणे आणि स्वच्छतेचा अवलंब करण्यास प्रोत्साहित करणे हा आहे. परराष्ट्र व्यापार विभागाचे सह महासंचालक प्रवीण कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि परराष्ट्र व्यापार विभागाच्या सहायक महासंचालक स्नेहल ढोके यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेदरम्यान डीजीएफटी नागपूरच्या कर्मचाऱ्यांनी शहरातील विविध भागात स्वच्छतेत सहभाग घेतला आणि स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी अनेक उपक्रम राबवले.

या उपक्रमामध्ये स्वच्छतेची शपथ, अभिलेख कक्ष व कार्यालय परिसराची स्वच्छता, स्वच्छता रॅली आणि अंबाझरी तलाव व उद्यानाची डीजीएफटी कर्मचाऱ्यांकडून  स्वच्छता  यांचा समावेश होता.

कर्मचाऱ्यांनी या भागांची स्वच्छता करून स्वच्छता राखण्याचे महत्त्व पटवून दिले. याच उपक्रमाचा भाग म्हणू न डीएव्ही हायस्कूल तसेच दयानंद उच्च प्राथमिक शाळा जरीपटका येथे निबंध स्पर्धा देखील आयोजित केली जाईल. या स्पर्धेचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबाबत जागरुकता निर्माण करून त्यांना स्वच्छतेच्या सवयी लावण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे.

'एक पेड मा के नाम' अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमही आयोजित केला जाणार आहे. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत डीजीएफटी नागपूरचे कर्मचारी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

2 ऑक्टोबर 2024 रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त या मोहिमेचा समारोप होईल. या दिवशी, डीजीएफटी कर्मचारी महात्मा गांधींना आदरांजली वाहतील आणि स्वच्छतेसाठी त्यांच्या वचनबद्धता दर्शवणार आहेत.

 

* * *

PIB Nagpur | S.Rai/D.Wankhede/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2059128) Visitor Counter : 60


Read this release in: English