आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून 2020-21 आणि 2021-22 या वर्षांचे भारताच्या राष्ट्रीय आरोग्य खात्याचे अंदाज पत्रक प्रकाशित

Posted On: 25 SEP 2024 10:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 सप्‍टेंबर 2024

 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 2020-21 आणि 2021-22 या वर्षांची भारताच्या राष्ट्रीय आरोग्य खाते - एनएचएचे अंदाज पत्रक प्रकाशित केले आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय प्रकाशित करत असलेल्या वार्षिक अहवालांच्या मालिकेतील ही आठवी आणि नववी अंदाज पत्रके आहेत.

सत्राला संबोधित करताना नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले, “एनएचएच्या या अंदाजांसाठी वापरलेल्या पद्धतीमध्ये गेल्या नऊ वर्षांत सुधारणा झाली आहे. परिणामी, सरकारने आरोग्यावर केलेल्या खर्चाचे  अधिक भक्कम आणि अचूक हिशेब मांडणे शक्य झाले आहे.” त्यांनी सांगितले, “आरोग्यावरील एकूण खर्चापैकी जनतेकडून उपचारांवर होणारा  खर्च 2013-14 मधील 64.2% वरून कमी होऊन 2021-22 मध्ये 39.4% झाला आहे, हे सकारात्मकतेचे चिन्ह आहे.”

डॉ. पॉल यांनी अधोरेखित केले, “आयुष्मान भारत पीएमजेएवायमुळे बचतीत एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त भर पडली आहे आणि त्याचा सकारात्मक प्रभाव या एनएचए अंदाज पत्रकात दिसून येत आहे.” त्यांनी सांगितले की इतर योजनांचा जसे की 2015-16 मध्ये सुरू केलेल्या मोफत डायलिसिस योजना,  25 लाख लोकांना लाभ मिळाला आहे.

यावेळी बोलताना केंद्रीय आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा  यांनी सांगितले, “सरकारकडून आरोग्यावर होणाऱ्या खर्चात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्याचवेळी जनतेकडून उपचारांवर होणारा  खर्च कमी होणे हे चांगले चिन्ह आहे.”

एनएचएच्या 2021-22 च्या अंदाज पत्रकानुसार देशात आरोग्य सुविधांवर सरकारकडून होणाऱ्या खर्चात सातत्याने वाढ होत आहे. आरोग्य क्षेत्रात सार्वजनिक गुंतवणूक वाढवण्याच्या हेतूने सरकार करत असलेले प्रयत्न यातून दिसून येतात. आरोग्यावरील खर्चात सरकारचा वाटा (जीएचई) देशाच्या एकूण जीडीपीत 2014-15 मधील 1.13% वरून 2021-22मध्ये 1.84% इतका वाढला आहे. सामान्य सरकारी खर्च (जीजीई) च्या बाबतीत  हा वाटा 2014-15 मधील 3.94% वरून 2021-22 मध्ये 6.12% इतका वाढला आहे.

Figure 1: Government Health Expenditure (GHE) as % of GDP

Figure 2: Government Health Expenditure (GHE) as % of General Government Expenditure (GGE)

Figure 3: Government Health Expenditure (GHE) and Out-Of-Pocket Expenditure (OOPE) as % of Total Health Expenditure (THE)

 

* * *

S.Kane/R.Bedekar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2058839) Visitor Counter : 64


Read this release in: English , Hindi