भारतीय निवडणूक आयोग
azadi ka amrit mahotsav

जम्मू आणि काश्मीरमध्ये दुसर्‍या टप्प्यातील मतदान शांततेत आणि उत्साही वातावरणात संपन्न

Posted On: 25 SEP 2024 9:38PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 सप्‍टेंबर 2024

 

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यात, मतदारांनी मतदान केंद्रांवर लांबलचक रांगा लावून पहिल्या टप्प्याप्रमाणेच मोठ्या उत्साहात मतदान केले. आज सकाळी 7 वाजता 26 मतदान केंद्रांवर सुरू झालेले मतदान कोणत्याही हिंसाचाराच्या घटनांशिवाय शांततेत पार पडले. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मतदान केंद्रांवर 54.11% मतदानाची नोंद झाली. सहा जिल्ह्यांमध्ये दुसर्‍या टप्प्यात झालेले एकूण मतदान 2024 च्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतदानापेक्षा जास्त आहे. जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातही 24 लोकसभा मतदारसंघांमधील 61.38% मतदानातून, जनतेचा  उत्साहवर्धक प्रतिसाद दिसून आला.  

दुसर्‍या टप्प्यात 6 जिल्ह्यांमधील एकूण 26 विधानसभा मतदारसंघांमध्ये उभारण्यात आलेल्या 3502 मतदान केंद्रांवर मतदान झाले. निवडणुकीच्या या टप्प्यात 233 पुरुष आणि 6 महिला उमेदवारांसह एकूण 239 उमेदवार रिंगणात होते. दुसऱ्या टप्प्यात बडगाम, गंदरबल, पुंछ, राजौरी, रियासी आणि श्रीनगर या सहा जिल्ह्यांमध्ये मतदान झाले.

जम्मू (19), उधमपूर (1) आणि दिल्ली (4) मधील एकूण 24 विशेष मतदान केंद्रांच्या माध्यमातून काश्मिरी स्थलांतरित मतदारांना त्यांचा मताधिकार बजावण्याची संधी देण्यात आली.

जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच घरबसल्या मतदानाची सुविधा सुरू करण्यात आली असून, शारीरिक मर्यादांमुळे एका जागी असलेल्या नागरिकांच्या दारापर्यंत  लोकशाहीची प्रक्रिया पोहोचवण्यात आली. 85 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आणि 40%  अपंगत्व असलेल्या अनेक दिव्यांग मतदारांनी घरूनच  मतदान करण्याचा पर्याय निवडला. मतपत्रिकेची गोपनीयता जपत, मतदानात पारदर्शकता राहावी, यासाठी संपूर्ण प्रक्रियेची व्हिडिओग्राफी करण्यात आली.

तिसऱ्या टप्प्यासाठी 1 ऑक्टोबर 2024 रोजी मतदान होणार आहे. 8 ऑक्टोबर 2024 रोजी मतमोजणी होणार आहे.

 

Border Polling stations in 84 Nowshera AC in Rajouri district

Border Polling Station 84-Nowshera, situated less than 1 Km away from the Bor

 

District-Wise Approximate Voter Turnout in Phase - 2 (7PM)

Sl. No.

Districts

No. ACs

Approximate Voter Turnout %

1

Budgam

5

58.97

2

Ganderbal

2

58.81

3

Poonch

3

71.59

4

Rajouri

5

68.22

5

Reasi

3

71.81

6

Srinagar

8

27.37

Above 6 Districts

26

54.11

Polling for the third phase will be held on October 1, 2024. Counting of votes is scheduled on October 8, 2024.

* * *

S.Kane/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2058834) Visitor Counter : 69


Read this release in: English , Hindi