आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था एम्स, नागपूर येथे तंबाखू निवारण केंद्राचे उद्घाटन
Posted On:
24 SEP 2024 8:02PM by PIB Mumbai
नागपूर 24 सप्टेंबर 2024
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था एम्स, नागपूर येथे तंबाखू निवारण केंद्राचे उद्घाटन 24 सप्टेंबर रोजी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय श्री . प्रतापराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी एम्स चे कार्यकारी संचालक डॉ (प्रा.) डॉ प्रशांत पी. जोशी; डीन (विद्यार्थी कल्याण), डॉ सिद्धार्थ दुभाषी; असोसिएट डीन (शैक्षणिक), डॉ रसिका गडकरी; रुग्णालयाचे प्रशासक, डॉ नितीन मराठे; अतिरिक्त प्राध्यापक; मानसोपचार विभाग, डॉ सुयोग व्ही. जयस्वाल, कम्युनिटी मेडिसिनचे अतिरिक्त प्राध्यापक डॉ. रंजन सोलंकी आणि सहायक प्राध्यापक, डॉ गौरव सिंग, कार्यक्रमास उपस्थित होते.

तंबाखू मुक्त केंद्राचे व्यवस्थापन मानसोपचार विभागाकडून सामुदायिक औषध विभागाच्या सहकार्याने केले जाईल. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तंबाखूमुक्त युवा अभियान 2.0 चा भाग म्हणून हे केंद्र सुरू करण्यात आले आहे.
तंबाखू मुक्त केंद्र संस्थेतील विविध विभागांमध्ये सेवा प्रदान करेल आणि सामुदायिक औषध विभागाच्या सहकार्याने समाजापर्यंत पोहोचेल.
यामध्ये औषधोपचार, समुपदेशन सेवा आणि सध्या स्थिती मधील अभिप्राय इत्यादी चा समावेश असेल.
* * *
(AIIMS PRO) | PIB Nagpur | D.Wankhede/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2058362)
Visitor Counter : 66