सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
अलीयावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिसॅबिलिटीज संस्थेने आंतरराष्ट्रीय कर्णबधीर सप्ताहानिमित्त 23 ते 29 सप्टेंबर दरम्यान आयोजित केले विविध कार्यक्रम
समावेशकता आणि सांकेतिक भाषेच्या हक्कांबाबत जागरुकता वाढवण्यासाठी आठवडाभर कार्यक्रमांचे आयोजन
Posted On:
24 SEP 2024 7:30PM by PIB Mumbai
मुंबई, 24 सप्टेंबर 2024
भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या अपंग व्यक्ती (दिव्यांग) सक्षमीकरण विभागा अंतर्गत, AYJNISHD, अर्थात अलीयावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिसएबिलिटीज (डी) मुंबई, दर वर्षी 23 ते 29 सप्टेंबर 2024 या कालावधीत ‘आंतरराष्ट्रीय कर्णबधिर सप्ताह’ साजरा करतो. यंदाची संकल्पना कर्णबधिर मुलांच्या हक्कांबद्दल जागरुकता निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करते, आणि ‘साइन अप फॉर साईन लँग्वेज राइट्स’, या ब्रीदवाक्याप्रति असलेली जागतिक बांधिलकी मजबूत करते.
उद्बोधक कार्यक्रमांच्या मालिकेतून, इंडियन साईन लँग्वेज (ISL), अर्थात भारतीय सांकेतिक भाषेचे महत्व सर्वसामान्य नागरिकांना समजावणे, हे मुंबईत वांद्रे पश्चिमेच्या या संस्थेच्या परिसरात आयोजित आठवडाभराच्या या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. यावेळी पथ नाट्य, नुक्कड नाटक, स्पर्धा आयोजित केल्या जातील, तसेच शिक्षक आणि पालकांना भारतीय सांकेतिक भाषेचे प्राथमिक प्रशिक्षण घेता येईल.

शिक्षणातील समावेशकतेप्रति समर्पित राहण्याच्या अनुषंगाने, अलीयावर जंग संस्था कर्णबधिर समुदायाला सक्षम बनवण्यासाठी आणि श्रवणदोष असलेल्या व्यक्तींच्या कल्याणाला प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध आहे. हा उपक्रम, भारतीय सांकेतिक भाषेबद्दल सर्वसामान्य नागरिकांमध्ये जागरुकता वाढवून ती सर्वांना सहज उपलब्ध करण्याच्या भारत सरकारच्या प्रयत्नांचा एक भाग आहे.
अलीयावर जंग संस्थेच्या मुंबई, सिकंदराबाद, कोलकाता, गोवा यासह एकूण पाच केंद्रांमध्ये प्रौढ कर्णबधिर व्यक्तींना, भारतीय पुनर्वसन परिषदेची मान्यता मिळालेला, ‘भारतीय सांकेतिक भाषा प्रशिक्षक’ हा दोन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम शिकवला जातो.
नागरिकांनी भारतीय सांकेतिक भाषा शिकण्यासाठी आणि त्याचा प्रचार करण्यासाठी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन या संस्थेने केले आहे.
‘साइन अप फॉर साईन लँग्वेज राइट्स’ या मोहिमेबद्दल आणि कार्यक्रमांबद्दल अधिक माहितीसाठी, कृपया येथे भेट द्यावी: https://ayjnishd.nic.in.
* * *
PIB Mumbai | N.Chitale/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2058347)
Visitor Counter : 86