आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एफएसएसएआय पश्चिम विभागाकडून न्युट्रीवाईझ 2024: नवोन्मेषातून सकस पोषण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन

Posted On: 19 SEP 2024 10:12PM by PIB Mumbai

मुंबई, 19 सप्टेंबर 2024

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (एफएसएसएआय) पश्चिम विभागाने - (डब्ल्यूआर) मुंबईत आयटीसीएफएसएएन इथे न्युट्रीवाईझ 2024: नवोन्मेषातून सकस पोषण कार्यक्रमात विविध महाविद्यालयांमधील खाद्यपदार्थ विज्ञान, तंत्रज्ञान आणि पोषण विभागांमधील 100 हून अधिक विद्यार्थी आणि या क्षेत्रातील तज्ञांना एकत्र आणले. अन्न आणि पोषण क्षेत्रांत नवोन्मेषाला प्रेरणा देण्याच्या उद्देशाने साजरा होत असलेल्या पोषण मास 2024 चा भाग म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

एफएसएसएआय डब्ल्यूआरच्या उपसंचालक वैदेही कळझुणकर यांच्या माहितीपूर्ण सत्राने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यांनी एफएसएसएआयच्या अन्न सुरक्षा नियमांचा आढावा घेत जनारोग्य राखण्यासाठी या नियमांचे महत्त्व विशद केले.

नवोन्मेषातून सकस पोषण अशा आशयाच्या शीर्षकांतर्गत आयोजित करण्यात आलेले चर्चासत्र हे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. वेगवेगळ्या क्षेत्रांतील तज्ञ या चर्चासत्रात सहभागी झाले होते.

नवोन्मेषाद्वारे सकस पोषण, समकालीन आव्हानांचा सामना आणि जागतिक अन्न व्यवस्था या विषयांवर विचारप्रवृत्त करणारे विविध मुद्दे या चर्चासत्रात मांडण्यात आले.

कार्यक्रमाला मराठी भाषा, शालेय शिक्षण आणि मुंबई पालक मंत्रालयाचे विशेष कर्तव्याधिकारी अमिर खान यांची उपस्थिती लाभली. भारताचे आरोग्यपूर्ण, सुरक्षित भविष्य घडवण्यासाठी शिक्षण आणि अन्न सुरक्षेचे महत्त्व या विषयावर त्यांनी विचार मांडले.

त्यानंतर झालेल्या बक्षीस वितरण समारंभात छायाचित्रकारिता आणि डिजिटल पोस्टर-मेकिंग स्पर्धेच्या विजेत्यांना गौरवण्यात आले. युवांमध्ये अन्न सुरक्षा व पोषणचा प्रचार करण्यासाठी सर्जनशीलता आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्याप्रती एफएसएसएआयच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब या साजरीकरणात दिसून आले.

एफएसएसएआय डब्ल्यूआरच्या प्रादेशिक संचालक प्रिती चौधरी (आयआरएस) यांनी मुख्य भाषणात युवा पिढीकडून परंपरा आणि नवोन्मेषाच्या एकत्रीकरण या क्षेत्रात भारताला जगाच्या नकाशावर स्थान मिळवून देण्यासाठी महत्त्वाचे असल्याचे सांगितले. अन्न व  पोषणाबाबतच्या वर्तमानातील समस्या सोडवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान अंगिकारताना पारंपरिक ज्ञान जपण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

कार्यक्रमात मुंबईत माटुंगा इथे असलेल्या गुरू नानक खालसा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘हेरिटेज ऑन प्लेट’ नामक भारतातील पाककृतींच्या समृद्ध वारशाविषयी नाटिका सादर केली. त्यामध्ये भारताच्या खाद्यसंस्कृतीची माहिती रंजक सर्जनशीलतेने मांडण्यात आली.

पोषण मास 2024 साजरा करण्याचे उद्दीष्ट गाठताना न्युट्रीवाईझ 2024 ने युवा पिढीला अन्नोद्योगाचे सुरक्षित, स्वच्छ आणि समृद्ध भवितव्य घडवण्यास हातभार लावण्याची प्रेरणा दिली.

 N.Chitale/R.Bedekar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2056840) Visitor Counter : 56


Read this release in: English