गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राजभवन गोवा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 74 वा वाढदिवस प्रार्थना, पूजा आणि जुन्या वृक्षांचे पुनरुज्जीवन करणाऱ्या अनोख्या उपक्रमाने झाला साजरा

Posted On: 17 SEP 2024 8:13PM by PIB Mumbai

पणजी, 17 सप्टेंबर 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 74 व्या वाढदिवसा निमित्त, त्यांच्याप्रति आदरभाव व्यक्त करण्यासाठी, राजभवन गोवा येथे, मंगळवार 17 सप्टेंबर 2024 रोजी राजभवन परिसरातील जुन्या वृक्षांचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने, प्रथमच ‘प्राचीन वृक्ष आयुर्वेदिक चिकित्सा’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, गोव्याच्या प्रथम महिला रिटा पिल्लई, पर्यावरण मंत्री अलेक्सो सिक्वेरा आणि इतर मान्यवरांनी मंदिर आणि गोशाळेत विशेष पूजा आणि राजभवन परिसरातील चॅपलमधील प्रार्थना, यासह विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. कार्यक्रमांच्या मालिकेचा एक भाग म्हणून राज्यपालांनी राजभवनाच्या प्रवेशद्वारा बाहेरील 500 वर्ष जुन्या बाओबाबच्या वृक्षाला पुष्पहार अर्पण केला. यावेळी पंतप्रधान मोदी यांचे आरोग्य उत्तम राहो आणि देशात शांती आणि समृद्धी राहो, अशी प्रार्थना करण्यात आली.

त्यानंतर जुन्या दरबार हॉलमध्ये झालेल्या सभेला संबोधित करताना राज्यपाल म्हणाले की, प्राचीन वृक्ष आयुर्वेदिक  चिकित्सा, ज्याला वृक्ष आयुर्वेदाच्या तत्त्वांनुसार वृक्ष संवर्धनासाठीचा  पोषण योग, म्हणूनही ओळखले जाते, असा हा उपक्रम राजभवन, गोवा द्वारे प्रथमच आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये राजभवनाच्या आवारातील जंतू संसर्गामुळे आणि इतर कारणांमुळे हळूहळू झिजत   चाललेली 100 वर्षांहून अधिक जुनी  सात झाडे, ओळखण्यात आली असून, त्यांचे आरोग्य संवर्धन करून त्यांना टवटवी  देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे ते म्हणाले.

“झाडांवर उपचार करून त्यांचे पुनरुज्जीवन करण्याची पारंपरिक पद्धत अजूनही जगाला फारशी माहिती नाही, म्हणूनच पारंपरिक पद्धतींच्या सहाय्याने जुनी झाडे वाचवण्यासाठी राजभवनात या आगळ्या वेगळ्या ‘ट्री थेरपी’चा प्रयोग करणे योग्य ठरेल,” राज्यपाल पिल्लई म्हणाले.

आयुर्वैदिक संरक्षण तज्ञ केरळमधील डॉक्टरांना यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. "हा उपक्रम जनतेला, विशेषतः युवा पिढीला गोव्याचा नैसर्गिक वारसा आणि अनोख्या परंपरांचे संरक्षण आणि जतन करण्यासाठी अशाच प्रकारचा आगळा वेगळा उपक्रम हाती घेण्याची प्रेरणा देईल," राज्यपाल म्हणाले. पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राजभवन गोवा ने असा उदात्त उपक्रम हाती घेतल्याबद्दल आपल्याला आनंद वाटत असल्याचे ते म्हणाले.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांनी पंतप्रधान मोदी यांना शुभेच्छा दिल्या, आणि म्हणाले की, देशासाठी सामर्थ्य आणि दूरदृष्टी याचा ते दीपस्तंभ आहेत. “त्यांच्या नेतृत्वाने भारताला केवळ आर्थिक विकास आणि तांत्रिक प्रगतीमधेच नव्हे, तर भारतीय संस्कृती आणि परंपरेचे सार पुनरुज्जीवित आणि जतन करण्यामध्ये देखील नव्या  उंचीवर नेले आहे,,” मुख्यमंत्री म्हणाले.  

गोव्याचे पर्यावरण जतन करण्यासाठी, शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी आणि जनतेला आपल्या प्राचीन वारशाने दिलेल्या ज्ञानाशी पुन्हा जोडण्यासाठी राजभवनाने हाती घेतलेल्या अनोख्या उपक्रमांची प्रशंसा करून मुख्यमंत्री म्हणाले की, प्राचीन वृक्ष आपल्या भूमीची कथा जतन करतात आणि निसर्गाप्रति असलेला आपला आदर भाव प्रकट करतात. “म्हणूनच, मी सर्व गोवावासियांना आवाहन करतो की, त्यांनी राज्यातील जुन्या, पारंपारिक वृक्षांचे जतन करणाऱ्या  अशा उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे.” ते म्हणाले.

भारतीय वैद्यकशास्त्राला गौरवपूर्ण आदरांजली अर्पण करण्याच्या उद्देशाने, राजभवन गोवाने अलीकडेच, 'आयुर्वेदाचे जनक  - चरक, आणि 'शस्त्रक्रियेचे  जनक- सुश्रुत, या प्राचीन भारतातील दोन महान वैद्यक चिकित्सकांचे पुतळे राजभवनाच्या प्रांगणात उभारण्याचा निर्णय घेतला आहे. याचे उद्घाटन या वर्षी सप्टेंबर महिन्याच्या अखेरीला होण्याची शक्यता आहे.

N.Chitale/R.Agashe/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 


(Release ID: 2055782) Visitor Counter : 42


Read this release in: English