संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संकटग्रस्त पाणबुडीतून बाहेर पडण्याचे प्रशिक्षण देणारी विनेत्र ही प्रशिक्षण सुविधा विशाखापट्टणम् येथे तैनात

Posted On: 14 SEP 2024 2:20PM by PIB Mumbai

 

13 सप्टेंबर 2024 रोजी विशाखापट्टणमच्या आयएनएस सातवाहन येथे पूर्व नौदल कमांडचे प्रमुख ध्वज अधिकारी वाईस ऍडमिरल राजेश पेंढारकर यांच्या हस्ते कलवरी श्रेणी पाणबुडी सुटका  प्रशिक्षण सुविधा( विनेत्र) ही प्रशिक्षण सुविधा तैनात करण्यात आली. कलवरी श्रेणीतील पाणबुड्या पाण्याखाली असताना आकस्मिक स्थितीमध्ये या पाणबुड्यांमधून बाहेर पडण्याची क्षमता वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने संपूर्ण देशी बनावटीच्या रचनेने या सुविधेची आत्मनिर्भर भारत या  उपक्रमाला अनुसरून स्वदेशातच  निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे संरक्षण क्षमतांमध्ये स्वयंपूर्णतेवर भारताचा भर अधोरेखित होत आहे.

कलवरी पाणबुडी सुटका प्रशिक्षण सुविधेची बांधणी मेसर्स लार्सन ऍन्ड टूब्रो डिफेन्स या कंपनीने केली असून तिच्यामध्ये पाच मीटर लांबीचा एस्केप टॉवर त्यालगत असलेल्या डायव्हिंग बेसिनसोबत बसवलेला आहे. या अतिशय अत्याधुनिक सुविधेचा वापर कलवरी श्रेणीतील पाणबुड्यांमधील कर्मचाऱ्यांना बेसिक आणि रिफ्रेशर अशा दोन्ही प्रकारचे सुटका प्रशिक्षण देण्यासाठी केला जाणार आहे. यामुळे पाणबुडीमधील आकस्मिक परिस्थितीला तोंड देऊन  तिच्यातून बाहेर पडण्याच्या प्रक्रियेमध्ये ते तरबेज होतील हे सुनिश्चित होणार आहे.

विनेत्र या नावाचा अर्थ आहे प्रशिक्षक, म्हणजे पाणबुडी कर्मचाऱ्यांमध्ये विश्वासाची उभारणी करण्याच्या दिशेने ते एक महत्त्वाचे पाऊल असेल, ज्यामुळे त्यांच्यामध्ये पाण्याखाली असताना कोणतीही आकस्मिक परिस्थिती उद्भवल्यास त्यातून बाहेर पडण्याचे कौशल्य आणि प्रशिक्षण यांनी ते सुसज्ज असल्याचे सुनिश्चित होईल. या प्रशिक्षण सुविधेमुळे भारतीय नौदलाची परिचालनात्मक सज्जता, सुरक्षा नियमावली आणि प्रशिक्षण पायाभूत सुविधा आणखी बळकट होणार आहेत.

***

N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2055057) Visitor Counter : 58


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil