अणुऊर्जा विभाग
azadi ka amrit mahotsav

अणुऊर्जा विभाग विशेष मोहीम 4.0 साठी सज्ज

Posted On: 13 SEP 2024 6:20PM by PIB Mumbai

 

अणुऊर्जा विभागाने (डीएई) विशेष मोहीम 4.0 साठी  तयारी सुरू केली आहे. सर्व घटक केंद्रे/सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम/ डीएईच्या अनुदानित संस्थांना विशेष मोहीम 4.0 च्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांची संबंधित केंद्रे/पीएसयू/अनुदानित संस्थांमध्ये नोडल ऑफिसर नामनिर्देशित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

विशेष मोहीम 4.0 ला मोठे यश मिळवून देण्यासाठी सर्व केंद्रे/पीएसयू/अनुदानित संस्थांना वास्तववादी उद्दिष्ट निश्चित करण्याची सूचना देण्यात आली आहे.

नोव्हेंबर 2023 ते ऑगस्ट 2024 या कालावधीत, डीएईने 20,480 फायलींचे पुनरावलोकन केले. याच कालावधीत एकूण 11,120 फायली निकाली काढण्यात आल्या.  रु. 2,49,05,142/- इतका महसूल जमा झाला.

व्हेरिएबल एनर्जी सायक्लोट्रॉन सेंटर (VECC), या डीएईचा एक घटक असलेल्या केंद्राने, डिसेंबर 2023 मध्ये, किनारपट्टीच्या पर्यावरणाचे रक्षण करण्याबाबत जनजागृती करण्यासाठी ‘बीच ट्रेक रूट क्लीन-अप’, म्हणजेच समुद्र किनाऱ्यांवर स्वच्छता कार्यक्रम राबवला.

विशेष मोहीम 4.0 साठी नवीन आणि सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करण्यासाठी विभागाचे प्रयत्न सुरु आहेत.

***

S.Kakade/R.Agashe/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2054809) Visitor Counter : 46


Read this release in: English