पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नवी दिल्ली येथे जागतिक ओझोन दिवस 2024 "मॉन्ट्रियल प्रोटोकॉल - ॲडव्हान्सिंग क्लायमेट ॲक्शन्स" या संकल्पनेसह साजरा

Posted On: 13 SEP 2024 5:34PM by PIB Mumbai

 

पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने आज नवी दिल्ली येथे तिसाव्या जागतिक ओझोन दिनानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ‘मॉन्ट्रियल प्रोटोकॉल: ॲडव्हान्सिंग क्लायमेट ॲक्शन्स’, अर्थात ‘मॉन्ट्रियल मूलविधान  : हवामान विषयक कृतीला चालना’, ही जागतिक ओझोन दिवस 2024 ची संकल्पना असून, यामधून ओझोन थराचे संरक्षण करण्यामध्ये आणि जागतिक स्तरावर व्यापक हवामान कृती उपक्रम राबवण्यामध्ये मॉन्ट्रियल प्रोटोकॉलची असलेली महत्वाची भूमिका अधोरेखित होते. जागतिक ओझोन दिवस, आपल्याला ओझोनचा थर पृथ्वीवरील जीवनासाठी आवश्यक असल्याची जाणीव करून देतो, आणि पुढील पिढ्यांकरता त्याचे संरक्षण करण्यासाठी सुरु असलेल्या हवामान कृती कार्यक्रमाची गरज अधोरेखित करतो. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या केंद्रीय सचिव लीना नंदन या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.

कार्यक्रमाला संबोधित करताना लीना नंदन यांनी सांगितले की,वाढत्या तापमानामुळे रेफ्रिजरेटर्स आणि एअर कंडिशनर्स यासारख्या थंडावा निर्माण करणाऱ्या प्रणालीचा वापर वाढतो, त्यामुळे तापमानात आणखी वाढ होते, आणि हे दुष्टचक्र सुरुच राहते. मॉन्ट्रियल प्रोटोकॉलची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे महत्त्वाचे असून, हवामान बदलाचा सामना करण्यासाठी सुरु असलेल्या आपल्या व्यापक प्रयत्नांशी ते घट्ट जोडले गेले आहे, यावर त्यांनी भर दिला. 

दैनंदिन जीवनातील वैयक्तिक निवडी आणि निर्णयांद्वारे पर्यावरणाबाबत जागरूक जीवनशैली अंगीकारून, शाश्वत आणि पर्यावरणाच्या दृष्टीने जागरूक राहण्याच्या पद्धतीचा प्रचार करून त्याला प्रोत्साहन देणाऱ्या मिशन लाइफ LiFE (पर्यावरणासाठी जीवनशैली), या  मोहिमेसह, मंत्रालयाच्या इतर उपक्रमांचा देखील त्यांनी उल्लेख केला. शाश्वत भविष्यासाठी आणि पृथ्वी मातेच्या संरक्षणासाठी महत्वाच्या असलेल्या पंतप्रधानांच्या ‘एक पेड माँ के नाम’ या राष्ट्रीय उपक्रमाच्या महत्त्वावरही त्यांनी भर दिला.

मॉन्ट्रियल प्रोटोकॉलचा भाग म्हणून, भारत जून 1992 पासून मॉन्ट्रियल प्रोटोकॉलची यशस्वीपणे अंमलबजावणी करत आहे. तसेच प्रोटोकॉलच्या फेज-आउट शेड्यूलच्या (कार्यक्रम) अनुषंगाने  ओझोन थर कमी करणारे पदार्थ फेज-आउट (वापर बंद) करणारे प्रकल्प आणि उपक्रम राबवत आहे.

***

S.Kakade/R.Agashe/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2054683) Visitor Counter : 96


Read this release in: English , Hindi , Tamil