संरक्षण मंत्रालय
नवी दिल्ली येथे भारत-मालदीव दरम्यान पाचव्या संरक्षण सहकार्य संवादाचे आयोजन
प्रविष्टि तिथि:
06 SEP 2024 4:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली येथे 6 सप्टेंबर 2024 रोजी भारत आणि मालदीव यांच्यातील 5 वा संरक्षण सहकार्य संवाद पार पडला. भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांनी केले, तर मालदीवच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व मालदीव राष्ट्रीय संरक्षण दलाचे प्रमुख, जनरल इब्राहिम हिल्मी यांनी केले.
या भेटीत दोन्ही बाजूंना द्विपक्षीय संरक्षण सहकार्याशी संबंधित विषयांवर चर्चा करण्याची संधी मिळाली. यावेळी इतर मुद्द्यांबरोबरच, सध्याच्या विविध संरक्षण सहकार्य विषयक प्रकल्पांच्या अंमलबजावणीला गती देण्यावर चर्चा झाली.
दोन्ही बाजूंनी उच्च स्तरीय देवाणघेवाण आणि क्षमता विकास प्रकल्प यासारख्या सामायिक हिताच्या इतर काही मुद्द्यांवरही चर्चा केली. आगामी द्विपक्षीय लष्करी सरावातील सहभागाच्या पैलूंवरही चर्चा झाली. ही संपूर्ण चर्चा फलदायी होती, ज्यामुळे नजीकच्या भविष्यात दोन्ही देशांचे सामायिक हितसंबंध वृद्धिंगत होतील आणि हिंद महासागर क्षेत्रात स्थैर्य आणि समृद्धी येईल.
***
S.Kane/R.Agashe/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2052629)
आगंतुक पटल : 104