कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
लाचखोरीप्रकरणी वरिष्ठ विपणन अधिकाऱ्याला सीबीआयकडून अटक
Posted On:
03 SEP 2024 9:11PM by PIB Mumbai
मुंबई, 3 सप्टेंबर 2024
केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) विपणन आणि निरीक्षण संचालनालय (कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार), नाशिक उपकार्यालयातील वरिष्ठ विपणन अधिकाऱ्याला तक्रारदाराकडून एक लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अटक केली आहे.
विपणन आणि निरीक्षण संचालनालयाच्या दोन अधिकाऱ्यांविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीनंतर ही अटक करण्यात आली आहे. कंपनीने उत्पादित केलेल्या 'गोवर्धन तूप' ब्रँडसाठी ऍगमार्क परवाना देण्याच्या बदल्यात अधिकारी एक लाख रुपयांची मागणी करत अवाजवी फायदा घेत असल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.
सीबीआयने यशस्वी सापळा रचून वरिष्ठ विपणन अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले. त्यानंतर त्याला अटक करून नाशिकमधील सीबीआय प्रकरणातील विशेष न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने या अधिकाऱ्याला 5 सप्टेंबर 2024 पर्यंत सीबीआय पोलिस कोठडी दिली आहे.
पुढील तपासात आरोपीच्या निवासी आणि कार्यालय परिसरात झडती घेतली असता दोषारोपासंदर्भातली कागदपत्रे उघडकीस आली.
सीबीआय या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
* * *
PIB Mumbai | N.Chitale/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2051542)
Visitor Counter : 48