परराष्ट्र व्यवहार मंत्रालय
महत्वपूर्ण तांत्रिक देखभालीमुळे पासपोर्ट सेवा पोर्टल काही दिवस उपलब्ध नसेल
Posted On:
29 AUG 2024 3:21PM by PIB Mumbai
गोवा, 29 ऑगस्ट 2024
पासपोर्ट सेवा प्रणाली अपग्रेडचा भाग म्हणून मोठ्या तांत्रिक देखभाल कामांमुळे पासपोर्ट सेवा पोर्टल नागरिकांसाठी गुरुवार 29 ऑगस्ट 2024 रोजी रात्री 8.00 वाजल्यापासून ते सोमवार 2 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 6:00 वाजेपर्यंत उपलब्ध राहणार नाही.
परिणामी पासपोर्ट सेवा केंद्र पणजी आणि पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र, मडगाव येथील 30 ऑगस्ट 2024 च्या सर्व अपॉईंटमेंट्स रद्द करण्यात आल्या आहेत.
तसेच 30.08.2024 (शुक्रवार) रोजी प्रादेशिक पारपत्र कार्यालय, पणजी, गोवा येथे कोणतीही सार्वजनिक चौकशी सुविधा नसेल.
* * *
PIB Panaji | N.Chitale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBPanaji
/PIBPanaji
/pib_goa
pibgoa[at]gmail[dot]com
/PIBGoa
(Release ID: 2049728)
अभ्यागत कक्ष : 57