वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी मुंबईतील विविध विकास प्रकल्पांचा घेतला आढावा
भारतातील लोकांचे राहणीमान सुलभ व्हावे यासाठी तंत्रज्ञानावर आधारित सुविधा निर्माण करण्याची सरकारची इच्छा : पीयूष गोयल
Posted On:
22 AUG 2024 8:47PM by PIB Mumbai
मुंबई, 22 ऑगस्ट 2024
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयुष गोयल यांनी आज मुंबईतील विविध विकास प्रकल्पांचा आढावा घेतला. यावेळी बोलताना ते म्हणाले, “उत्तर मुंबई, उत्तम मुंबई’’ करण्याचा संकल्प अधिक दृढ झाला आहे. आम्ही विकासाच्या क्षेत्रात 'सरकारचा संपूर्ण' दृष्टिकोन ठेवून काम करत आहोत. शिक्षण, क्रीडा, गृहनिर्माण किंवा वाहतूक क्षेत्र असो, या सर्व क्षेत्रातील प्रश्नांवर काम करण्याची संधी मिळाली हा मला, स्वत:चा सन्मान वाटतो."
या भेटीमध्ये मंत्री पीयूष गोयल यांनी वैदिक उद्यानाच्या प्रस्तावित स्थानाला भेट देऊन उद्यानाच्या विकासासाठी केलेल्या कामाचे कौतुक केले.

त्यानंतर मंत्री गोयल यांनी चिंचोली येथील ‘बीएमसी शताब्दी’ शाळेला भेट देऊन शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मालाड पश्चिम येथील अथर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशीही त्यांनी संवाद साधला.
यानंतर पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर पीयूष गोयल यांनी दहिसर हिरे उद्योगातील संबंधितांबरोबर संवाद साधला.

प्रसारमाध्यमांतील प्रतिनिधींबरोबर बोलताना गोयल म्हणाले, सरकार ऑनलाइन व्यापार आणि परकीय थेट गुंतवणूक यांना प्रोत्साहन देत आहे. भारतातील लोकांचे राहणीमान सुलभ व्हावे यासाठी तंत्रज्ञानावर आधारित सुविधा निर्माण करण्याची सरकारची इच्छा आहे, याचा त्यांनी पुनरुच्चार केला. तथापि, असा व्यापार हा कायदाधिष्ठित असावा आणि ग्राहकांवर कोणत्याही प्रकारे थोपवला जावू नये; त्यांच्या आवडीनिवडीविषयी सक्ती केली जाऊ नये. पोर्टलवर दिलेले ‘रेटिंग’ प्रामाणिक असले पाहिजे आणि ई-कॉमर्सने निष्पक्ष व्यापाराला प्रोत्साहन दिले पाहिजे, असे ते म्हणाले.

* * *
PIB Mumbai | S.Kane/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2047844)
Visitor Counter : 48